महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलत चालले का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 2 September 2020

हिंदूत्वाचा झेडा मिरवर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र आली मात्र मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षात खडाजंगी झाली. शेवटी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष पक्षाला सोबत घेऊन शिवसेनेना पक्षांनी महाविकास आघाडी निर्माण केली.

राजकीय पक्ष एका विशिष्ट विचार सरणी घेऊन चालतो. कठीण परिस्थितीत विचार सरणीसोबत तडजोड केली जात नाही, मात्र सध्या राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी काहीही केले जाते. असे यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवकणुकीत घडले. हिंदूत्वाचा झेडा मिरवर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र आली मात्र मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षात खडाजंगी झाली. शेवटी कॉग्रेस आणि राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष पक्षाला सोबत घेऊन शिवसेनेना पक्षांनी महाविकास आघाडी निर्माण केली. शेवटी मुख्यमंत्रीपद शिवसेनेने आपल्या गळ्यात पाडून घेतले. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलत चालले का?  

आजही ७० टक्के समाज हा जातीवर चालतो. विकासाच धोरण हे सुरु राहते मात्र ज्यावेळी कुणताही मुद्दा ऊरत नाही त्यावेळी मात्र जात, धर्म, पंत, वंश या नावाखाली अनेक गोष्टी या खपविल्या जातात. गरीब मध्यमवर्गीय युवकांना राजकारण क्षेत्र आजही वर्जीतच आहे असे का? 
- आमरजितसिंह राजपूत

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राजकारणाचा एक अनोखा खेळ बघायला  मिळाला. राजकारणात हे बिनभरवश्याच झाले आहे. कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाही. मग तो इ. ईव्हीएम घोटाळा का असेना. पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते पैशाच्या लालसेपोटी पक्ष सोडून द्यायला तयार होतात. अन् आपण अश्याच लोकांना निवडून देतो. जे वर्षानुवर्षे राहिलेल्या पक्षाला देतात. ते काय जनतेची सेवा करणार. आपण समोरच्या व्यक्तिचे योग्य निरीक्षण करूनच त्या व्यक्तीचे निवडून द्यायला पाहिजे.
- कृष्णा गाडेकर

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रतील राजकीय समीकरण बदललेले दिसले. दोन कट्टर विरोधी पक्ष एकत्र देऊन सत्ता येऊन सत्ता स्थापन केली. त्याचबरोबर 
धर्मनिरपेक्ष आणि हिंदूत्व माणसाऱ्या दोन विभिन्न विचार सरणीचे पक्ष एकत्र आले आणि सत्तेवर दावा केला. शेवटी सत्तेसाठी काय पण म्हणण्याची वेळ पक्षांवर आली.
-रुपेश गायकवाड

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News