'हे' धोरण इनोव्हेटिव्ह थिंकीग, प्रॉक्टीकल, परफार्मन्सवर अधिक भर देणार: PM

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 7 September 2020

आत्मनिर्भर भारतासाठी 'स्किल्ड' विद्यार्थी निर्माण होणार आहेत. हे धोरण मुलभुत अभ्यास, भाषा, प्रशिक्षण यावर फोकस करणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण प्रत्येक विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणार आहे असा विश्वास प्रधामंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली : पुर्वी विद्यार्थी मिळेत त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचे आणि अभ्यासक्रम आवडला नाही म्हणून अर्ध्यावर शिक्षण सोडून द्यायचे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या करियरला ब्रेक लागायचा. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना कोणत्याही अभ्यासक्रमाला कोठेही प्रवेश घेता येतो. आवडीनुसार करियरची निवड करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही वयात करियरची वाट बदलता येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण अभ्यासाव्यतिरिक्त आकलणावर अधिक फोकस करते. अभ्यासक्रमाच्या पुढे जाऊन इनोव्हेटीक थिंकीग, आवड, प्रॉक्टीकल आणि परफार्मन्सवर अधिक भर देते, असे मत प्रधामंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला
  
'राष्ट्रीय शिक्षा धोरन निती' या विषयावर सोमवारी चर्चासत्र आयोजिक करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडीयो कॉन्फ्ररन्सिंगद्वार मार्गदर्शन केले. यावेळी सर्व राज्याचे राज्यपाल, मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक, सर्व राज्य शिक्षण मंत्री, विद्यापीठाचे कुलगुरु आणि वरिष्ठ आधिकरी उपस्थित होते.

आधुनिक जग वेगाने बदलत आहे. बदलत्या काळानुसार नोकरीत परिवर्तण होत आहे. आधुनिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षणात बदल करावा लागतो. नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना ज्ञान आणि कौशल्य दोन्ही मिळणार आहे. आत्मनिर्भर भारतासाठी 'स्किल्ड' विद्यार्थी निर्माण होणार आहेत. हे धोरण मुलभुत अभ्यास, भाषा, प्रशिक्षण यावर फोकस करणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण प्रत्येक विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवणार आहे असा विश्वास प्रधामंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News