लॉकडाऊन असताना पोलीस पोहोचले केक घेऊन; वयोवृद्ध काकांच्या डोळ्यांत आले पाणी..

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 April 2020

सोशल मिडियावर या व्हायरल व्हिडिओने लोकांची मने जिंकली आहेत. हे प्रकरण हरियाणातील पंचकूलामधील आहे. तेथे पोलीसांनी एका वयवृध्द व्यक्तींचा वाढदिवस साजरा केला आहे.

जिंकले लोकांचे मन

सोशल मिडियावर या व्हायरल व्हिडिओने लोकांची मने जिंकली आहेत. हे प्रकरण हरियाणातील पंचकूलामधील आहे. तेथे पोलीसांनी एका वयवृध्द व्यक्तींचा वाढदिवस साजरा केला आहे. वयवृध्द व्यक्ती हे एकटचे राहतात. अशात पोलीस त्यांच्या घरी केक घेऊन गेले तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. ते रडू लागले. पोलीसांनी त्यांना शांत केले, मग त्यांनी आनंदाने केक कापला.  सर्व पोलीसांनी एका कुटुंबासारखे एकत्र येऊन ‘हॅपी बर्थडे टू यू’ काका गाणे गायले आणि त्यांना काकांना सांगितले की, आम्ही तुमच्या मुलासारखेच आहोत. 

पहिले व्हिडिओ पाहा
 

हा व्हिडिओ ‘कमीशनर ऑफ पंचकूला’ यांनी ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, लॉकडाऊनच्या दिवसातील वाढदिवस देखील विशेष आहेत. पंचकूलाच्या सेकटर ७ मध्ये राहणारे करण पुरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

मनापासून सल्लाम

चांगल काम

कौतुक झाले पाहिजे
 

उत्तम काम

या व्हिडिओची बातमी करे पर्यंत सुमारे २ हजार व्यूज, १८८ लाईक्स आणि ३८ री ट्विट मिळाले आहेत. यासह सर्व लोक पंचकोला पोलिसांचे खूप कौतुक करत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News