काव्यमय गटारी

दिलीप श्रीपाद बारवकर , नाशिक
Thursday, 1 August 2019

प्यालो मी ! मग 

ग्लासाला का महत्व देता

घुट घुट तर पीत असतो ,

ग्लासांन वर ग्लास 

का मोजत बसता ||

पडलो असे नका म्हणू ,
ही तर माझी ऍक्शन होती |
ऊपडी करून ओतायला गेलो ,
बाटलीच रिकामी 
पडली होती ||

चढली असे नका म्हणू ,
ही तर स्वप्नातली झेप होती |
सहज तीला कुरवाळायला गेलो ,
बाटलीच दिसायला 
नशिली होती ||

प्यालो मी ! मग 
ग्लासाला का महत्व देता
घुट घुट तर पीत असतो ,
ग्लासांन वर ग्लास 
का मोजत बसता ||

टोकता तुंम्ही 
म्हणून ठरवल 
दारू सोडून वळणावर येऊ |
अन् पुढच्याच वळणावर 
तुम्हीच म्हणता 
ये चल 
जरा घोटभर घेऊ ||

पितांना मी रातभर ,
अनुभवली धूंद धूंद नशा |
पहाटे ऊठून 
श्रावणात दिसली ! मला
माझ्याच संसाराची दशा

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News