असा कवी एक प्रवासी... 

अनुजा पाटील
Saturday, 17 October 2020

कवीचा प्रवास थोडा वेगळा असतो...
जिथे भावनांच्या पावसात चिंब भिजता येतं...
आणि भावानांमधेच वाहून...
प्रेमाच्या सागराचा तळही गाठता येतो...

शब्द त्याचे निःशब्द करिती...
असा कवी एक प्रवासी... 
शब्दांची गाडी.. शब्दांचीच फेरी... 
शब्दांनीच करतो तो पूर्ण विठ्ठल वारी... 
असा कवी एक प्रवासी...
कवीचा प्रवास थोडा वेगळा असतो...
जिथे भावनांच्या पावसात चिंब भिजता येतं...
आणि भावानांमधेच वाहून...
प्रेमाच्या सागराचा तळही गाठता येतो...
सूर्याच्या कोवळ्या किरणांना स्पर्श करत...
अचानक मन मग चंद्रावर फिरून येतं...
कधी दुःखाच्या काट्यांवर चालत...
स्वप्नांच्या मखमली कळीतले सुख मन शोधण्या निघतं...
इथे तर, शब्दांची वाट अन शब्दांचीच दुनिया...
निःशब्द करणारी हि सफर वेगळी...
जिथला कवी एक प्रवासी...

-  अनुजा पाटील

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News