घे ना सावरून साजणा

दिपाली साळेकर - खामकर
Saturday, 24 August 2019

घे ना सावरून मन हे साजणा तुझ्याच मनाला बिलगलयं ते
मनास माझ्या तुझाच धाक ना तुझीच वाट बघतयं ते

घे सावरून मन हे साजणा तुझ्याच आठवणीत रमतयं ते
मनात माझ्या तुझ्याच भावना दाटून आलय नभ बघ ते

घे सावरून मन हे साजणा तुझ्याच मिठीत गुंतलय ते
मनात माझ्या तुझ्याच कामना बेधुंद वाऱ्यात हरवलंय ते

घे सावरून मन हे साजणा तुझ्याच विचारांत बेभान ते
मनात माझ्या तुझ्याच वासना ओल्याचिंब पावसात न्हालं ते

घे सावरून मन हे साजणा तुझ्याच प्रेमात वाहिलयं ते
मनात माझ्या तुझ्याच यातना आक्रोशंानी टाहो फोडतयं ते

घे सावरून मन हे साजणा तुझ्याच सोबती फिरतय ते
मनात माझ्या तुझ्याशीच सामना आशेने तुझ्याकडे बघतयं ते

घे ना सावरून मन हे साजणा तुझ्याच मनाला बिलगलयं ते
मनास माझ्या तुझाच धाक ना तुझीच वाट बघतयं ते

आता तरी घे ना सावरून बावरे मन हे माझे ....

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News