खेळाडूंना ऑगस्टपर्यंत मैदानात उतरता येणार नाही

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 29 June 2020

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची माहिती

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतीय क्रिकेट संघाचा सराव स्थगित आहे, मात्र सध्या परिस्थिती पाहता खेळाडूंना ऑगस्टपूर्वी मैदानात उतरता येणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले.

"संघातील खेळाडूंचे शिबिर ऑगस्टपूर्वी सुरू होण्याची शक्‍यता कमी आहे, मात्र त्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, असे गांगुली म्हणाले. यापूर्वी कोरोना ब्रेकनंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात होणाऱ्या कसोटी सामन्यातून जागतिक क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे.

दोन्ही देशांमधील तीन सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना 8 जुलैपासून सुरू होईल. शिवाय भारतीय संघ जूनमध्ये श्रीलंकेचा दौरा करणार होता, तर ऑगस्टमध्ये झिम्बाब्वेत टी - 20 मालिका खेळण्यासाठी जाणार होते. कोरोना संसर्गाची तीव्रता लक्षात घेत बोर्डाने खेळाडूंचे आरोग्य लक्षात घेऊन हे दोन्ही दौरे पुढे ढकलले आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News