कोरोनासाठी खेळाडूंनी दिले तब्ब्ल ८- ८ कोटींचे दान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 25 March 2020
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सी आणि मँचेस्टर सिटी क्लबचे प्रशिक्षक पेप गार्डिओला यांनी सुमारे 8-8 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.

कोरोनाव्हायरसच्या वाढत्या उद्रेकाने संपूर्ण जगाला व्यापून टाकले आहे. याचा सामना करण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील लोकांनी पुढाकार घेतला आहे. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सी आणि मँचेस्टर सिटी क्लबचे प्रशिक्षक पेप गार्डिओला यांनी सुमारे 8-8 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. या व्यतिरिक्त पोर्तुगाल फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्यांच्या एजंटने रुग्णालयासाठी 3 अतिदक्षता विभागांची देणगी दिली आहे. त्यांची किंमत सुमारे 8 कोटी आहे.

कोरोनाव्हायरसमुळे जगातील 50 हून अधिक देशांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. यामुळे, 230 कोटीहून अधिक लोक घरात कैद झाले आहेत.

मेस्सीने दिलेली रक्कम बार्सिलोनामधील रुग्णालये, दवाखाने आणि इतर घरातील आरोग्य सेवांवर खर्च केली जाईल. हॉस्पिटल व्यवस्थापनाने ट्विट केले की, “लिओ मेस्सीने क्लिनिकमध्ये कोरोनाव्हायरसशी लढण्यास मदत केली आहे. लिओ, तुमच्या बांधिलकी आणि मदतीबद्दल तुमचे आभार गार्डिओला हा बार्सिलोनाचा माजी खेळाडू आणि व्यवस्थापक आहे.

पोर्तुगालमध्ये आतापर्यंत 2300 हून अधिक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 33 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढलेला इटलीनंतर स्पेन हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. स्पेनमधील लॉकडाऊन 11 एप्रिलपर्यंत वाढवता येऊ शकते. 14 मार्च रोजी देशात 15 दिवस लॉकडाउन जाहीर करण्यात आले. आतापर्यंत, 42,058 लोक संक्रमित झाले आहेत आणि 2,991 लोक मरण पावले आहेत.

रोनाल्डोने पोर्तुगालमधील आपली दोन हॉटेल तात्पुरती रुग्णालयात रूपांतरित केली आहे. त्याने लिस्बन आणि फंचलमधील त्याच्या सीआर 7 हॉटेल्समध्ये रूग्णालयात रूपांतर केले आहे. कोरोनाव्हायरस-संक्रमित लोकांवर येथे विनामूल्य उपचार केले जातात. याव्यतिरिक्त, डॉक्टर आणि परिचारिकांना पगार देखील देण्यात देईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News