INDvBAN वर्ल्ड कपच्या फायनलनंतर मैदानातच भिडले दोन्ही संघाचे खेळाडू

यिनबझ टीम
Tuesday, 11 February 2020

गेल्या रविवारी म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी भारत विरुध्द बांगलादेश यांच्यात U19 world cup final खेळवण्यात आला. सलग चौथी वेळ वर्ल्ड कप आपल्या नावावर करणाऱ्या भारताने यावेळीही सर्वोत्तम कामगिरी करत फायनलमध्ये पदार्पन केले होते.

गेल्या रविवारी म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी भारत विरुध्द बांगलादेश यांच्यात U19 world cup final खेळवण्यात आला. सलग चौथी वेळ वर्ल्ड कप आपल्या नावावर करणाऱ्या भारताने यावेळीही सर्वोत्तम कामगिरी करत फायनलमध्ये पदार्पन केले होते, तर पहिली वेळ बांगलादेशने सर्व संघाना पिछाडीवर टाकत फायनलमध्ये दमदार एंट्री केली होती. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने 177 धावांचा डोंगर उभा केला. त्याचा पाठलाग करत असताना डकवर्थ लुइस नियमानुसार बांगलादेशने हा सामना आपल्या खिशात घातला आणि पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकल्याचा जल्लोष त्यांनी साजरा केला.

सध्या सामन्यानंतर एक व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. जल्लोष साजरा करण्यासाठी बांगलादेशचे खेळाडू मैदानावर धावत आले आणि भारतीय संघाच्या समोर त्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली. त्यातच एका भारतीय खेळाडूने त्यांना उत्तर देत अंगावर धावून आलेल्या बांगलादेशी खेळाडूला बाजूला ढकलले आणि वाद सुरू झाला.

व्हिडीओ...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News