हा खेळाडू शोधतोय त्याची मारूती ८००

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 August 2020

हा खेळाडू शोधतोय त्याची मारूती ८००

९० च्या दशकात प्रत्येकाकडं मारूती ८०० असावं असं प्रत्येकाला वाटतं होतं. तसंच सचिन तेंडूलकरलाही वाटतं होतं. त्यामुळे सचिनने व्यवसायिक खेळाडू झाल्यानंतर मारूती ८०० विकत घेतली होती. सचिनची खेळात प्रगती झाल्यानंतर सचिननं अधिक गाड्या घेतल्या. अनेक गाड्या असल्याने सचिननं ती गाडी विकली होती.

सचिनला सध्या ती गाडी हवी आहे असं त्याने एका वेबचॅट शो मध्ये चाहत्यांना सांगितले. त्या गाडीची संपु्र्ण माहिती सचिनने चाहत्यांना सांगितली असून कार विषयी कुणाला कल्पना असल्यास मला संपर्क साधा असं सुध्दा सचिननं चाहत्यांना सांगितलं आहे.

९० च्या दशकात अनेक तरूण-तरूणींना ही कार आपल्याकडे असावी असं वाटतं होतं. त्या दरम्यान मलाही ही कार माझ्याकडं असावी असं वाटतं होतं. माझी खेळातली प्रगती झाल्यानंतर मारूती ८०० खरेदी केली होती. जसा जगात बदल झाला, तसं नवीन कार विक्रीसाठी येऊ लागल्या आणि कारची लोकप्रियता कमी झाली.

२०१४ साली कंपनीनं या कारचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक चाहत्यांना त्यावेळी दु:ख झालं होतं. त्यावेळी कारची खरी लोकप्रियता दिसून आली होती. त्यावेळी चाहत्यांनी कारच्या आठवणी जाग्या केल्या होत्या.

कारच्या आठवणी विषयी सांगताना सचिन म्हणाला की, "माझं घर एका थिअटरजवळ होतं. तिथं काही लोक कारमधून चित्रपट पाहायला येतं होतें. तेव्हा मी माझ्या घराच्या बालकनीमधून गाड्या बघत बसायचो."

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News