'या' खेळाडूने मिळवला कोरोनावर विजय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 April 2020
  • मार्च महिन्यात त्यांना कोविड - 19 या साथीच्या रोगाची लागण झाली होती.

न्यूयॉर्क : अमेरिकन डेव्हिस कपचे माजी कर्णधार पॅट्रिक मॅकेन्रो यांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. मार्च महिन्यात त्यांना कोविड - 19 या साथीच्या रोगाची लागण झाली होती. न्यूयॉर्कच्या वेस्टचेस्टर काउंटी येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत त्यांची चाचणी घेण्यात आली.

"आज सकाळी तपासणीनंतर कोविड - 19 चाचणी निगेटिव्ह आली. मी व माझी पत्नी मेलिसासाठी ही एक चांगली बातमी आहे," असे एका ट्विटर व्हिडीओमध्ये पॅट्रिक यांनी सांगितले. पॅट्रिक हे सात वेळा ग्रॅंड स्लॅम एकेरी जिंकणाऱ्या जॉन मॅकेन्रो यांचे बंधू आहेत.

सध्या न्यूयॉर्क शहरात या साथीच्या रोगाचे थैमान सुरू आहे. त्यात जवळपास बारा हजार लोकांचा बळी गेला आहे. मागील दोन दिवसांत पाचशेपेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. जे लोक या साथीच्या रोगातून बरे झाले आहेत, अशा लोकांनी या रोगाविरुद्ध लढा देण्याची अपेक्षा आहे. मीसुद्धा सर्वतोपरीने मदत करणार आहे, असे मॅकेन्रो म्हणाले. मॅकेन्रोने 1995 मध्ये सिडनी येथे एटीपी एकेरीचे एकमेव विजेतेपद जिंकले होते. 1989 च्या फ्रेंच ओपन स्पर्धेत एक ग्रॅंड स्लॅम आपल्या नावे केले होते. 2007 मध्ये ओरेगॉनमधील पोर्टलॅंड येथे झालेल्या अंतिम सामन्यात रशियाला मॅकनरॉने 4-1 ने पराभूत करून अमेरिकन डेव्हिसकपचे जेतेपद जिंकले होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News