हि खेळाडू म्हणजे 'ब्युटी विथ ब्रेन' आणि रेकॉर्डब्रेक !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 July 2019
  • एलिस पेरीचा अनोखा विक्रम
  • ट्वेंटी-२० मध्ये हजार धावा आणि बळींचे शतक अशी दुहेरी कामगिरी

लंडन : ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरी हिने ट्वेंटी २० क्रिकेटमध्ये एक हजार धावा आणि बळींचे शतक अशी दुहेरी कामगिरी केली. 

ही कामगिरी पुरुष खेळाडूलाही जमलेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पेरीने नाबाद ४७ धावा करीत ही मजल मारली.

या मालिकेपूर्वीच तिने ट्वेंटी २० मध्ये बळींचे शतक पूर्ण केले आहे. ही कामगिरी करण्याची शाहीद आफ्रिदीला संधी होती. पण, तो निवृत्त झाला तेव्हा त्याने टी- २० क्रिकेटमध्ये १४१६ धावा आणि ९८ बळी मिळविले. शकिब अल हसन या क्रमवारीत दुसरा आहे. त्याच्या १४७१ धावा आणि ८८ बळी झाले आहेत.  

इतकंच नव्हे तर पेरी हि ऑस्ट्रेलिया फुटबॉल संघाचेही प्रतिनिधित्व करत आहे.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News