अभिनय क्षेत्रात कल्याणीच्या कलागुणांना वाव

विनोद सूर्यवंशी
Monday, 13 January 2020

स्वप्न तर कोणालाही पडते. मात्र ते वास्तवात उतरविण्यासाठी जिद्द हवी. क्षेत्र कोणतेही असो; प्रयत्नांची पराकाष्ठा अपार पाहिजे, यश हमखास मिळते, याचे मूर्तिमंत उदाहरण 

नवापूर :  वाचलं होतं... उडणाऱ्या पंखांना क्षितिजे नसतात, त्यांना कवेत घेणारे आकाश हवे असते... अशाच प्रकारे जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात कलागुणांना वाव देऊन नवापूर येथील सर्वसामान्य कुटुंबातील कल्याणी टिभे हिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. तिचा ‘हिरकणी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, लवकरच दूरचित्रवाणीच्या एका वाहिनीवर तिची मालिकाही सुरू होणार आहे.

शहरातील नदीकाठी असलेल्या घरात  राहणारे टिभे कुटुंब. त्या कुटुंबातील  प्रवीण टिभे यांची कन्या कल्याणी.  या युवतीने अभिनयाच्या कौशल्यावर कमांड मिळवीत मराठी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. ध्येय गाठण्यासाठी  जिद्द, चिकाटी, अविरत परिश्रम हे आवश्‍यक असते. ते असल्यास तुम्हाला यशाचे शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे म्हटले जाते. मात्र, ते कल्याणी हिने प्रत्यक्षात सिद्ध करून दाखविले आहे. कल्याणी  हिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘हिरकणी’ चित्रपटात भूमिका साकारली आहे.

२७ जानेवारीपासून  ‘स्टार प्रवाह’वर सुरू होणाऱ्या ‘जुळ्या भावांची लहान बहीण’ या मालिकेतून जनतेसमोर वेगळ्या भूमिकेत येत आहे.कल्याणी लहानपणापासून हुशार : शैला, कल्याणी खूप हुशार आहे. कलागुण,  वक्तृत्व हे वंशपरंपरागत लाभले असून, आधी मी लहान असताना भाषण लिहून देत असे. पण, आता ती सक्षम आहे. सर्वांत महत्त्वाचे आमच्या संपूर्ण परिवाराने तिच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून सदैव तिला प्रोत्साहन दिले आहे, संकुचित मनाचे  काळीज ठेवले नाही, माझी इच्छा आहे ती खूप मोठी अभिनेत्री व्हावी, असे शैला टिभे यांनी सांगितले.

शैक्षणिक करिअर
दिल्ली येथे ‘सीबीआय’ मुख्यालयात एक वर्ष फॉरेन्सिक एक्स्पर्ट म्हणून काम केले; परंतु तिला ‘रो’मध्ये रुची आहे. ती परीक्षेची तयारी करतेय. महाविद्यालयात असताना तिला नृत्य, वक्तृत्व, नाटकाची आवड असल्याने मित्र- मैत्रिणीसोबत भाग घेत असे. तिला प्रथम वर्षापासून लहान-मोठ्या भूमिका मराठी मालिकांमध्ये मिळत गेल्या. अविरत परिश्रम व चांगल्या मैत्री स्वभावामुळे रंगमंचवर नाट्य स्पर्धा जिंकल्या. मराठी चित्रपट ‘हिरकणी’मध्ये लहानशी भूमिका मिळाली. पण, ती बड्या अभिनेत्यासोबत. सध्या कल्याणी कोल्हापूर येथे मालिकांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नवापूरच्या माजी उपनगराध्यक्षा शैलाताई टिभे यांची नात व  प्रवीण टिभे यांची कन्या, तर राहुल टिभे, दीपक टिभे, किरण टिभे  यांची पुतणी आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News