बेरोजगार तरुणांना मोफत रोजगार उपलब्ध करुन देणार 'ही' फोरम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 July 2020

कोरोना काळाच नोकरी गमावलेल्या उमेदवारांसाठी 'कोविड-१९ फी जॉब्स' नावाचे गुगलवर एक फोरम सुरु केले.

कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉ़कडाऊन सुरु केले, लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय बंद पडले. त्यामुळे लाखो कामगाराच्या नोकऱ्या गेल्या. कामगारांवर उपासमारिची वेळ आली. अशा बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करुन देण्यासाठी दोन तरुणांनी अनोखी शक्कल लढवली. बी२बी ई- कॉमर्समध्ये काम करणारे सुरेश जैन आणि रजत अग्रवाल या दोन तरुणांनी गुगल फोरम बनवून तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देत आहेत.

दोन तरुणांनी व्यवसायाचे मार्केटींग करण्यासाठी नोकरी डॉट कॉम, जॉब, शाईन, इंडीड या रोजगार देणाऱ्या संकेतस्थळावर काही उमेदवारांचा शोध घेतला, मात्र त्यांना कौशल्यप्राप्त उमेदवार मिळाले नाही. त्यानंतर नोकरी दोणाऱ्या कंपन्यांना कॉल करुन विचारना केली, मात्र त्यांनी उमेदवार नसल्याचे सांगितले. कोरोना काळात कौशल्य असूनही अनेक मजूरांच्या नोकऱ्या गेल्या. अशा कौशल्य प्राप्त मजूरांसाठी नोकरी देण्यासाठी फेसबुकवर एक पेज तयार केले. काही दिवसात १०० पेक्षा अधिक उमेदवारांनी नोकरीसाठी पसंदी दर्शवली. 

कोरोना काळाच नोकरी गमावलेल्या उमेदवारांसाठी 'कोविड-१९ फी जॉब्स' नावाचे गुगलवर एक फोरम सुरु केले. नोकरीसाठी तरुणांनी या फोरमवर नोंदणी करायची आहे. ज्या कंपन्यांना कामगारांची आवश्यकता आहे अशा कंपन्या उमेदवारांची निवड करतात. त्यामुळे बेरोजगार तरुणांना विनामुल्य रोजागर मिळतो. या दोन तरुणांकडे सध्या कौशल्य प्राप्त ८ हजार ५०० पेक्षा अधिक बेरोजगारांचा डाटा आहे. हा डाटा ४०० पेक्षा अधिक एच आर कडे पाठवण्यात आला. भविष्यात विनामुल्य नोदणीकृत तरुणांना रोजगार मिळणार आहे. बेरोजगार आणि रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्यांसाठी ही माहिती विनामुल्य पुरवली जाणार आहे.  

नोंदणी केलेल्या उमेदवारांची माहिती सुरक्षित ठेवण्यात आली. रोजगार देणाऱ्या कंपण्यांची सत्यता पडताळून त्यांना माहिती पुरवी जाते. तसेच रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या कंपन्यांचे ईमेल तपासून त्यांची रोजगार क्षमता किती आहे? हे पाहीले जाते त्यानंतर कंपन्यांना डाटा पाठवला जाते. अशी माहिती सुरेश जैन यांनी दिली. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News