कोरोना विषाणूवर मात करणार प्लाझ्मा थेरपी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 21 April 2020

मुंबई महापालिकेने या आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई : कोरोना विषाणूला संपवू शकेल, अशी लस अद्याप तयार झालेली नाही; परंतु जुनीच प्लाझ्मा उपचारपद्धती परिणामकारक ठरत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने या आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाची बाधा रोखण्यासाठी कोणतीही लस नसली, तरी माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती या विषाणूला वरचढ ठरत आहे. रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावरच रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे आता प्लाझ्मा थेरपी म्हणजे रक्तद्रव उपचार पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. भारतात केरळमध्ये हा प्रयोग करण्यात येणार असून, केंद्र सरकारनेही मान्यता दिली आहे. चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया आदी देशांतही प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरली आहे.

या उपचारपद्धतीत कोरोनामुक्त व्यक्तींच्या रक्तातील प्लाझ्मा रुग्णाला दिला जाईल. असे उपचार फक्त अत्यवस्थ रुग्णांवर केले जाण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार आजारातून बरे झालेल्या व्यक्तींना रक्तदान करण्याचे आवाहन करत आहोत. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या निर्देशांनुसार पुढील निर्णय घेण्यात येतील, असे महापालिकेच्या उप आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.

 

नक्की काय होते?

  • रोगप्रतिकारक शक्ती बळावलेल्या कोरोनामुक्त व्यक्तींच्या रक्तद्रवात प्रतिपिंडे तयार होतात.
  • अशा व्यक्तीच्या रक्तद्रवामार्फत प्रतिपिंडे कोरोनाबाधिताच्या शरीरात पोहोचवली जातात.
  • ही प्रतिपिंडे लसीप्रमाणे काम करून कोरोना रुग्णाच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार करतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News