शिरखुर्म्याचा खर्च टाळून वृक्षारोपण 

ज्ञानेश्वर रायते
Saturday, 8 June 2019
  • बारामती येथील पर्यावरणमित्र फय्याज शेख याचा उपक्रम

बारामती - गेली चार वर्षेही तो रमजान ईद साजरी करतो, मात्र वेगळ्या पद्धतीने. हो, बारामतीतील पर्यावरणमित्र फय्याज शेख ईदच्या दिवशीचा शिरखुर्म्याचा खर्च टाळून झाडे लावतो. या वर्षी ‘सह्याद्री ट्रेकर्स’ने त्याला साथ दिली. बारामतीतील झाडांसाठी सुरू असलेल्या भिशीतून २० हजारांचा, तर फय्याजने शिरखुर्म्यावरील ३२ हजारांचा खर्च वाचवून या वर्षी ५० झाडे लावली.

बारामतीत फय्याज शेख याच्या पुढाकारातून सह्याद्री ट्रेकर्स हा गिर्यारोहण करणारा युवकांचा ग्रुप तयार झाला आहे. दरवर्षी आपल्या मित्रांना रमजान ईदच्या शिरखुर्म्यासाठी बोलावणाऱ्या फय्याजने त्यासाठी होणारा खर्च निसर्गाच्या प्रेमाकडे वळवला. देशी झाडे लावण्यासाठी सणाचे निमित्त शोधले. पहिल्या वर्षी ७ झाडे बारामती शहरात लावली, मग दुसऱ्या, तिसऱ्या वर्षी प्रत्येकी १२ झाडे लावली. या वर्षी ही संख्या ५० झाडांवर गेली. त्याला  कारणही असेच घडले. सह्याद्री ट्रेकर्समधील सर्वच गिर्यारोहक मित्रांनी ही संकल्पना उचलून धरत झाडांसाठी एक भिशी सुरू  केली. महिना प्रत्येक सदस्याने १०० रुपये जमा करण्याची ती भिशी होती. ती भिशी यशस्वी झाली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News