मनसेचं महाधिवेशन अस असणार नियोजन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 January 2020

सकाळी 9.00 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते नविन झेंड्याच अनावरण करण्यात येणार आहे. या अधिवेशनात महत्त्वाचे ठराव मांडण्यात येणार

हिंदूह्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मनसेचं महाधिवेशन गोरेगाव येथील नेस्को मैदानात होणार आहे. या अधिवेशनाला सकाळी 9 वाजता असून बारकोड पद्धतीने मनसैनिकांना प्रवेश देण्यात येणार आहे.

या अधिवेशनाला राज्यातून प्रचंड प्रमाणत मनसैनिक उपस्थित राहणार आहेत. मनसेची वाटचाल ही हिंदूत्वाच्या दिशेने चालू आहे. मनसेकडून 'विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा' ही ट्यागलाईन देण्यात आली आहे. याच बरोबर अमित ठाकरे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. सकाळी 9.00 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते नविन झेंड्याच अनावरण करण्यात येणार आहे. या अधिवेशनात महत्त्वाचे ठराव मांडण्यात येणार असून राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News