पुराचं हे ठिकाण तरूणाईसाठी झालंय सेल्फीपॉईंट

महेश घोलप
Tuesday, 18 August 2020

पुराचं हे ठिकाण तरूणाईसाठी झालंय सेल्फीपॉईंट

पुराचं हे ठिकाण तरूणाईसाठी झालंय सेल्फीपॉईंट

सांगली - गेल्यावर्षी पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांनी समुद्राचं रूप धारण केलं होतं. सांगली जिल्ह्यातील वारणा नदीवरती असलेले अनेक पूल पूर आल्यानंतर तरूणाईसाठी सेल्फीपॉईंट होत आहेत. विशेष म्हणजे सांगली आणि कोल्हापूर जिल्हयाला जोडणारा चरण-सोंडोली पूल तरूणाईसाठी सेल्फीपॉंईट झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील ३२ शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे ३२ टिएमसी असलेलं चांदोली धरण पुर्णपणे भरले आहेत. धरण भरल्यामुळे वारणा नदीच्या पात्रात चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग प्रशासनाकडून सोडण्यात आला आहे. चार किलोमीटरवरती असलेला आरळा नदीचा पूर देखील पाण्याखाली आहे.

सेल्फीपॉईंट ठरलेला स्पॉट चांदोली धरणापासून साधारण १२ किलोमीटर अंतरावर आहे. धरणातून मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने  शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर चरण-सोंडोली पूलावर पाणी असल्याने भागातले अनेक तरूण तिथं सेल्फी काढताना दिसत आहेत. मागच्यावर्षी तुलनेत यंदा कमी पुराचं पाणी कमी असल्याचे असल्याचे तुकाराम नेर्लेकर यांनी सांगितले.

लोकांनी विनाकारण पाण्यात उतरून सेल्फी काढू नये, पुराच्या पाण्यातून अनेकदा जनावरे किंवा आरोग्याला घातक घटक वाहून जातात. त्यामुळे पाण्याचा संपर्क झाल्यास संबंधित व्यक्ती आजारी पडू शकते. आगोदरचं कोरोनाचं संकट असताना लोकांनी काळजी घ्यावी -  शंकर नायकवडी

गेल्यावर्षी वारणा नदीला महापूर आला होता व पुलापर्यंत पाणी आल्याने सर्व लोकांनी त्याचा आनंद घेतला होता. त्याप्रमाणे यंदाही महापूर आला आहे, पुलाला पाणी लागल्याने तेथे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे. महापूर पाहण्यासाठी सर्व लोक आकर्षित झाले आहेत व विशेषतः तरुणाई ची सेल्फी साठी तोबा गर्दी झालेली असून सर्व पूराचा आनंद घेत आहेत - संजय बाबर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News