मसिक पाळीत होणारा त्रास 'या' घरगुती उपायाने करा दूर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 January 2020

दर महिन्याची कटकट म्हणून काही तरुणी मासिक पाळीच्या वेदणेकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रन मिळू शकतो. काही घरेलू उपाय करुन पाळीत होणार आजार दूर केला जाऊ शकतो. आम्ही असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

तरुणींना दर महिन्यात एकदा तरी मासिक पाळीला सामोरी जावे लागते. मासिक पाळीच्यावेळी काही तरुणींना त्रास, वेदणा सहन कराव्या लागतात. पोट दुखीमुळे स्ंपुर्ण शरीरात वेदणा होतात. त्यामुळे काही महिलांना औषध-गोळ्या घ्याव्या लागतात. तर मासिक पाळीत होणार त्रास काही महिला अंगावर काढतात. दर महिन्याची कटकट म्हणून काही तरुणी मासिक पाळीच्या वेदणेकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रन मिळू शकतो. काही घरेलू उपाय करुन पाळीत होणार आजार दूर केला जाऊ शकतो. आम्ही असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

मेथीच्या दाण्याता उपयोग

मेथी ही अनेक आजारांवर गुणकारी औषध आहे. मेथीमध्ये अॅटीऑक्सीडेंट्स, विटामिन आणी मिनरल असतात. यांचा उपयोग मासिक पाऴीत होणारा त्रास कमी करण्यासाठी होतो. मोथी बारीक वाटून त्याचे चुर्ण बनवावे, एक ग्लास कोमट  पाणी किंवा दुध घेऊन त्यामध्ये मोथी चुर्ण टाकावे, मासिक पाळीच्या कालावधित सकाळ-संध्याकाळ पिल्याने आराम मिळतो. तसेच मोथीच्या दान्याचा चहा करुन प्यावा त्यानेही आराम मिळू शकते.

ओवा आणि आद्रक

मासिक पाळीच्या काळात तरुणीच्या रोटात गॅस निर्माण होते. त्यामुळे पोटात वेदणा होतात. ओवा आणि आद्रक यांचा उपयोग केल्यामुळे आराम मिळतो. एक चम्मच ओवा आणि एक चम्मच मीठ कोमट पाण्यात मिळसून पिल्याने वेदनेपासून आराम मिळतो. पाळीच्या काळात आद्कचे काही तुकडे एक कप पाण्यात टाकून उकळावे.त्यात स्वादासाठी मध मिसळून प्यावे त्यामुळे आराम मिळतो.

पपई आणि तुळसीचे पान

पाळीच्या काळात पपई खाल्याने शरिरामध्ये ब्लॅड सर्कुलेशन वाढते. त्यामुळे पाळी लवकर येते. त्याचबरोबर कच्च्या पपीईचं ज्युस पिल्याने आराम मिळतो. मासिक पाळीत रोज पपई खाल्ल्याने पचनक्रीया व्यवस्थित होते आणि त्रासापासून आमरा मिळतो. तुळशीची पाने एंटीबॉयोटिक आहेत. चाहामध्ये तुळशीची पाने टाकून चाहा घेतल्याने वेदनेपासून आराम मिळतो.

पाळीच्या काळात करा व्यायाम

पाळीच्या काळात हलका व्यायाम केल्याने अनेक फायदे होतात. तरुणींचा मुड फ्रेंश राहतो, ताज तवान वाटत, त्रास कमी होतो. त्यात वॉकिंग, स्ट्रेचिंग, एयरोबिक्स आदी व्यायाम प्रकारांचा समावेश होतो. मासिक काळात मेडिटेशन केल्याने समाधान वाटत. लक्षात ठेवा जबरदस्ती कठीन व्यायाम करु नये, त्याच बरोबर आराम महत्त्वाचा आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News