फक्त ९९ टक्क्यांच्या पुढे असाल तर येथे या...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

पुणे - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतलेल्या ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेद्वारे तुम्हाला राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा नामांकित महाविद्यालयात प्रवेश हवा असेल, तर तुमचे पर्सेंटाइल हे किमान ९९च्या पुढे असणे अपेक्षित आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी राज्यातील सरकारी, खासगी, स्वायत्त अशा सर्व महाविद्यालयांत मिळून एक लाख ३९ हजार जागा आहेत. यामध्ये शासकीय महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी ३५ हजार जागा आहेत.

या महाविद्यालयांसह पुणे, मुंबईमधील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश हवा असेल, तर विद्यार्थ्यांना अधिकाधिक पर्सेंटाइल अपेक्षित आहे. परीक्षा कक्षाने निकाल जाहीर केला असला, तरीही अद्याप पर्सेंटाइलनुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केलेली नाही. पर्सेंटाइल आणि प्रत्यक्ष गुण हे जाहीर न केल्यामुळे सरकारी महाविद्यालयांसह नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशाचा पर्सेंटाइलनुसार अपेक्षित ‘कट ऑफ’ किती असेल, हे जाणून घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक दुर्गेश मंगेशकर म्हणाले, ‘‘परीक्षा कक्षाने विषयानुसार पर्सेंटाइल जाहीर केले असले, तरी अद्याप एकूण ‘रॅंक’ जाहीर झालेली नाही; परंतु शासकीय महाविद्यालयांसह पुणे, मुंबईमधील ‘टॉप’ तीन महाविद्यालयास प्रवेश हवा असेल, तर विद्यार्थ्यांना अंदाजे ९९.६५ पर्सेन्टाईल अपेक्षित आहे.’’‘देवधर क्‍लासेस’चे संस्थापक-संचालक संदीप देवधर म्हणाले, ‘‘एमएचटी-सीईटी परीक्षेद्वारे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ९९.२० पर्सेंटाइल आवश्‍यक असणार आहेत.

जेईई मेन्स परीक्षेचा योग्य पद्धतीने अभ्यास केल्यास एमएचटी-सीईटी परीक्षेत चांगले गुण पडतात.’’करिअर समुपदेशक केदार टाकळकर म्हणाले,‘‘यंदा एमएचटी-सीईटी परीक्षेत पर्सेंटाइलद्वारे विद्यार्थ्यांचे गुणांकन होत आहे. कॉम्प्युटर, मॅकेनिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, सिव्हिल अशा विद्याशाखांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना ‘कट ऑफ’ वाढलेला असणार आहे.’’

अभियांत्रिकी प्रवेशाच्या जागा व महाविद्यालये

  प्रवेशासाठी जाग महाविद्यालयांची संख्या

महाराष्ट्र          १,३९,९८३   ३५०
पुणे               ४७,४०२   ११०
मुंबई             २५,९६०   ६३

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News