पायाने पेपर लिहून मिळवले इतके टक्के; दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतूक 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

लखनऊ - दिव्यांग मुलांच्या कामगिरी कित्येक पट्टीने चांगली व्हायला लागल्याची उत्तम उदाहरण आपण देशात पाहतो, पण उत्तर प्रदेशातील अमर बहादुर तरूणाने पायाने पेपर लिहून चक्क ५९ टक्के मार्क मिळविल्याने त्याची सर्वत्र चर्चा आहे. विशेष म्हणजे त्याला लहान पणापासून हात नाहीत, पायाने पेपर लिहिल्याने त्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. 

अमर पहिल्यापासून खूप जिद्दी तरूण आहे, पहिल्यापासून त्याला वेगळं काहीतरी करायचं आहे. त्यासाठी असे प्रयत्न करत असतो असे त्यांच्या आईने सांगितले. तसेच अमरचा निकाल पाहून सगळ्यांना सुखद धक्का बसला आहे. 

लहानपणापासून त्याला हात नाहीत, त्यामुळे तो लहान असताना आम्ही अमरला जेवण भरवत होतो. आता मात्र तो त्याच्या पायात चमचा पकडून जेवण करतो. त्याला चांगलं शिक्षण करायचं आहे, पण आमची आर्थिक परिस्थिती योग्य नसल्याने त्याला चांगल्या ठिकाणी शिक्षण देऊ शकलो नसल्याची खंत त्याच्या आईने बोलावून दाखवली. सरकारकडून काही मदत मिळाल्यास खूप बरं होईल असं त्यांच्या आई केवला देवीने सांगितले. 

परीक्षेच्या निकालाने अमरचा विश्वास प्रचंड वाढला आहे, "मला अजून मेहनत करायची आहे आणि शिक्षक बनायचं आहे. तसेच देशाचे आणि समाजाचे नाव रोषन करणार असल्याचे" दिव्यांग अमरने सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News