भारतातील "या" मंदिरात जायला लोकं घाबरतात..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 26 December 2019
  • या ठिकाणी ८४ मंदिर आहेत. मात्र या मंदिरात कोणीही प्रवेश करत नाहीत.
  • येथे चित्रगुप्तला देखील स्थान देण्यात आले आहे, असा लोकांचा समज आहे.
  • जो कोणीही हिंदू मरेल त्याची आत्मा या मंदिरात येऊन चित्रगुप्तला भेटण्यासाठी या मंदिरात येते.

मुंबई : भारतात मंदिर म्हणजे एक पवित्र स्थळ मानले जाते. त्याठिकाणी गेल्यावर मनातील भीती, चिंता दूर होते. मात्र भारतातील एक असं मंदिर आहे, ज्याठिकाणी जाण्यास लोकं घाबरतात. 

उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश राज्यात चंबा प्रदेशात भारमोर गावात एक प्राचीन मंदिर आहे. याठिकाणी जाण्यास लोकं घाबरतात. त्याठिकाणच्या माहितीनुसार, या मंदिरात यमाचे निवासस्थान आहे. 

या ठिकाणी ८४ मंदिर आहेत. मात्र या मंदिरात कोणीही प्रवेश करत नाहीत. येथे चित्रगुप्तला देखील स्थान देण्यात आले आहे, असा लोकांचा समज आहे. जो कोणीही हिंदू मरेल त्याची आत्मा या मंदिरात येऊन चित्रगुप्तला भेटण्यासाठी या मंदिरात येते. त्यानंतर त्याच्या कर्मानुसार त्याला शिक्षा किंवा मुक्ती देण्याचं काम चित्रगुप्त आणि यम करतात. त्यामुळे या ठिकाणी आत्म्यांचा वास असतो असेही लोकांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, ज्या कोणाला या मंदिरात दर्शन घ्यायचे असेल, ते बाहेरूनच दर्शन घेतात. आत प्रवेश करण्याची कोणीही हिंमत करत नाहीत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News