'या' वयोगटातील लोकांना सर्वाधिक कोरोनाचा धोका 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 2 March 2020
  • चीनमध्ये  या विषाणूची लागण झालेल्या ४४ हजार रुग्णांपैकी ६० पेक्षा जास्त वयोगटातील आहेत.

चीनमधून पसरलेल्या कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसमुळे अनेकांचे जीव देखील गेले आहेत. मात्र ठराविक वयोगटातील लोकांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचं समोर आलं आहे.

याबाबत चीनमधील एका अहवालात सविस्तर मांडण्यात आले आहे. कोरोना झालेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये ६० व त्यापेक्षा अधिक वयोगटातील रुग्णांना कोरोना होण्याचे प्रमाण अधिक दिसून आले आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वीच कोरोनाला धोकादायक म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे कोणत्या वयोगटातील लोकांना कोरोनाचा धोका अधिक आहे, असा सर्व्हे करण्यात आला होता. त्यामध्ये सविस्तर आलेख समोर आला आहे.

आतापर्यंत जगातील ६१ देशांत कोरोना झाला असून ८६ हजार लोकांना अजूनपर्यंत कोरोना विषाणूची लागण झाली आहे. चीनमध्ये  या विषाणूची लागण झालेल्या ४४ हजार रुग्णांपैकी ६० पेक्षा जास्त वयोगटातील आहेत. त्यापुढील वयोगटातील रुग्णांचे प्रमाण देखील अधिक आहे, असं या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. देशात हा ट्रेंड सर्वत्र पाहायला मिळत आहे. 

कोरोना विषाणूंचा सर्वाधिक हल्ला हा फुफुसांवर होताना समोर आले आहे. त्यामुळे लहान मुलांना हा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. मात्र असं असताना देखील विषाणूंची लागण झालेल्यांमध्ये लहान मुलांचे प्रमाण कमी आहे.

१० ते १९ वयोगटातील केवळ एक टक्के मुलांना याची लागण झाल्याचे दिसून आले आहे. तसेच यामध्ये कोणताही लहान मूल बळी पडल्याचं दिसून आलं नाही. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News