प्रलंबित अस प्रतिबिंब...

सुनिल पवार
Tuesday, 25 June 2019

इथे प्रत्येकाला 
चारित्र्याचे दाखले हवे असतात
सालं जीवन आहे का कोर्ट आहे
असं उद्वेगाने म्हणावे लागतेय

इथे प्रत्येकाला 
चारित्र्याचे दाखले हवे असतात
सालं जीवन आहे का कोर्ट आहे
असं उद्वेगाने म्हणावे लागतेय
त्यांचे अघोषित खटले 
नाहक अपराधी ठरवत जातात..!!

काळ्या कोटातले पांढरपेशे वकील
पावला पावलावर भेटत असतात
काही आपल्या बाजूने,
तर काही विरोधात दिसतात
काही चक्क उलट तपासणीही करतात
पण तरीही खटला प्रलंबित
कळत नाही 
माझे वकील नेमके कुठे असतात..!!

निःपक्षी न्यायमूर्तींचीही वानवा दिसते
तारखेवर तारीख पडत राहते
साक्षीदार परागंदा दिसतो
अन् डाग अधिक गडद होत जातो..!!

निकाल लागेल तेव्हा लागेल
दोषी ठरेल किंवा निर्दोषही असेन
पण त्यानंतरही
लोकांच्या नजरेत 
कितीसा बदल झालेला असेल
प्रश्न तसाच प्रलंबित आणि खटलाही
कदाचित हे कोडे मृत्यूनंतरच सुटेल..!!
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News