पायल तडवी प्रकरण नेमकं हत्या की आत्महत्या?

शुभम शिंदे
Tuesday, 4 June 2019

प्रकरणं ऍट्रॉसीटी असल्याच दिसत असलं तरी अजुनही हे सिद्ध झालेलं नाही. आता पायलच्या खासगी आयुष्यावर जरा नजर टाकू. जवळपास सहा महिन्यांपूर्वी पायलने सलमानशी प्रेम विवाह केला. तर मग पायल आणि सलमान वेगळे का राहायचे? घरी राहिल्यास अभ्यासात व्यत्यय येतो, त्यामुळे पायल आणि सलमान एकत्र राहत नसे, असे काही वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमध्ये दाखवण्यात आले. हे कारण पटत नसलं तरी मानायला हरकत नाही. परंतु याच कारणामुळे जर पायल सलमान सोबत राहत नसे तर मग पायलला सिनीयर्सकडून होणाऱ्या त्रासामुळे वसतीगृहातही तिचा अभ्यास होत नसे. मग तरीसुद्धा पायल वसतीगृहात का राहत होती? 
 

गेल्या काही दिवसात चर्चेत असलेले पायल तडवी प्रकरण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पायल तडवी या तरूणीने अंकिता खंडेलवाल, भक्ती मेहरे आणि हेमा अहूजा या तीन सिनीयर्स कडून होणाऱ्या रॅगिंगला आणि जातीवरून दिल्या जाणाऱ्या त्रासाला कंटाळून रूग्णालयाच्या वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. हे वृत्त सर्व बातमीपत्रे आणि चॅनल्समध्ये दाखवण्यात आले. त्यामुळे हे प्रकरण आत्महत्या असल्याचा संदेश सर्व महाराष्ट्रात पोहचला. मात्र या प्रकरणासंदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत, ज्यावर प्रकाश पडायलाच हवा. पायल त़डवी ही मूळची जळगावची, पायलने ज्यावेळी मेडिकल सीटला ऍडमीशन घेतली त्यावेळी ती मागासवर्गीय होती आणि मागासवर्गासाठी राखीव असणाऱ्या कोट्यातूनच पायलला मेडिकलची सीट मिळाली. त्यानंतर पायलने धर्मांतर केले आणि ती मुस्लिम झाली. मग पायलने मागासवर्गीय सुविधा का सोडल्या नाहीत? आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पायलचा पती सलमान यांच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार पायलचे आई-वडील दोघेही सरकारी नोकरी करतात. तर मग पायल मागासवर्गीय सुविधांचा लाभ कसा घेत होती?

पायल तडवी प्रकरणात ज्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला त्यावेळी पायलचा फक्त मागासवर्गीय म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरून ती एससी किंवा एसटी असल्याचे सिद्ध होत नाही, आणि पोलिसांकडे देण्यात आलेल्या कोणत्याही तक्रारीत पायलचा आदिवासी म्हणून उल्लेख नाही. त्यामुळे ही केस ऍट्रोसिटीची होऊच शकत नाही. शिवाय पोलिसांच्या हाती लागलेल्या व्हॉट्सऍपवरील संभाषणात सुद्धा आदिवासी किंवा ती अन्य कुठल्या जातीची म्हणून संभाषण असल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं नाहीये. 

राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीने पायल तडवी प्रॅक्टिस करत असणाऱ्या नायर रुग्णालयातील विद्यार्थी, वैद्यकीय कर्मचारी, परिचारिका, शस्त्रक्रिया विभागात काम करणारे सहाय्यक यांची चौकशी केली, असता पायल हिला तिन्ही आरोपींकडून जातीवाचक शेरेबाजी, टोमणे मारण्यात येत होते, असे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हे प्रकरणं ऍट्रॉसीटी असल्याच दिसत असलं तरी अजुनही हे सिद्ध झालेलं नाही. 

आता पायलच्या खासगी आयुष्यावर जरा नजर टाकू. जवळपास सहा महिन्यांपूर्वी पायलने सलमानशी प्रेम विवाह केला. तर मग पायल आणि सलमान वेगळे का राहायचे? घरी राहिल्यास अभ्यासात व्यत्यय येतो, त्यामुळे पायल आणि  सलमान एकत्र राहत नसे, असे काही वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमध्ये दाखवण्यात आले. हे कारण पटत नसलं तरी मानायला हरकत नाही. परंतु याच कारणामुळे जर पायल सलमान सोबत राहत नसे तर मग पायलला सिनीयर्सकडून होणाऱ्या त्रासामुळे वसतीगृहातही तिचा अभ्यास होत नसे. मग तरीसुद्धा पायल वसतीगृहात का राहत होती? 

आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी पायलने वसतीगृह का सोडलं नाही? असे प्रश्न उपस्थित होतात त्यामुळे पायलच्या खाजगी आयुश्यात सर्व काही सुरळीत होत का त्याच्या नात्यात काही बिघाड होता याचा तपास होणंही तितकच गरजेच आहे. 

पायलच्या आत्महत्येची घटना घडल्यापासून अद्याप कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. तीनही आरोपी शिकवल्याप्रमाने एकसारखेच बोलतात आणि तपासात जराही मदत करत नसल्याचा दावा क्राईम ब्रांच ने कोर्टात केला. दरम्यान डॉ. हेमा अहुजा पायल तडवीला तू मागासवर्गीय कोट्यातून आली आहेस अस म्हणाल्या होत्या असं पायल तडवी ची सहकारी मैत्रीण स्नेहल शिंदे हिने पोलिसांकडे साक्ष दिली आहे. याआधी पायलचे वकील नितीन सातपुते यांनी मागच्या सुनावणीत ही आत्महत्या नसून हत्या आहे. आणि पायल तडवी च्या मृतदेहावर जखमेचे निशाण असल्याचाही दावा केला होता. मात्र आता पायल च्या कुटुंबीयांनी वकील बदलला आहे. त्यामुळे हे प्रकरण नेमक हत्या आहे का आत्महत्या या दोन्ही बाजुने या प्रकरणाचा तपास होण गरजेच आहे. 

पायलला सिनीयर्स कडून त्रास दिला जात होता, याबाबत कोणतंही दुमत नाही, आणि याबद्दल अंकिता खंडेलवाल, भक्ति मेहरे आणि हेमा अहुजा या तिघींना शिक्षाही व्हायलाच हवी. पणं या प्रकरणात ही हत्या होती का आत्महत्या याचा तपास करणं देखील तितकच गरजेच आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News