युवकाच्या गुप्तांगावर पेट्रोल टाकून मारहान; स्वरा म्हणाली...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 February 2020

चोरीच्या आरोपाखाली अस्पृश तरुणावर पेट्रोल टाकून मारहान केल्याची धक्कादायक घटना राजस्थान जिल्ह्यातील नागौर शहरात घडली. या घटनेचा निषेध देशभरातून होत आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी घटनेवर तीव्र प्रतिक्रीया दिली आहे.

चोरीच्या आरोपाखाली अस्पृश तरुणावर पेट्रोल टाकून मारहान केल्याची धक्कादायक घटना राजस्थान जिल्ह्यातील नागौर शहरात घडली. या घटनेचा निषेध देशभरातून होत आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी घटनेवर तीव्र प्रतिक्रीया दिली आहे.

रविवारी 16 फेब्रुवारीला नागौर जिल्ह्यातील करणू गावात दुचाकी सर्विसींगसाठी 24 वर्षीय तरुण आपल्या भावासोबत गेला होता. भीम सिंग आणि इतर चार लोकांनी तरुणावर चोरीचा आरोप केला. तरुणाने चोरीचा आरोप फोटाळल्यामुले भीम सिंग आणि चार लोकांनी तरुणाला बेदम मारहान केली. आरोपींनी  तरुणाला  तरुणाची पॅंट काढुन त्याच्या गुप्तांगावर पेट्रोल टाकले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणाली, "नागौर जिल्ह्यातील अस्पृश तरुणावर झालेला आत्याचाराचा व्हिडीओ मी पाहू शकत नाही. अकल्पनीय अत्याचार !!! अशोक गेहलोक आणि राहूल गांधी कृपया एक्शन घ्या" अस कॅप्शन देऊन ट्विट केल आहे.

पाहा ट्विट-

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी ट्विट करुन राजस्थान सरकारला कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. नागौर जिल्ह्यातील दोन अस्पृश तरुणांचा मारहान व्हिडीओ खुप भयानक आणि भितीदायक आहे. राजस्थान सरकारने दोषींवर तात्काळ कार्यवाही करावी असे म्हणत ट्विट केले आहे.

राजस्थानचे समाज कल्याण मंत्री भंगर लाल यांनी आरोपींवर कार्यवाही करण्यासाठी सरकारला आदेश दिले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News