ऐतिहासिक, पौराणिक वारसा लाभलेलं  हे शहर तुम्हाला माहित आहे का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 April 2019

ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरांपैकी एक ते म्हणजे पातूर शहर..! ऐतिहासिक, पौराणिक वारसा लाभलेलं  हे शहर पावन झालयं ते अनेक धार्मिक स्थळांनी ...., निर्सगाच्या कुशित लपलेले सोपिनाथ महाराज व नानासाहेब मंदिर, उंच टेकडी परिसरावर वसलेले रेणुका माता मंदिर व पातूर शहराच्या मध्यभागी वसलेले पातूरचे आराध्य दैवत संत श्री. सिदाजी महाराज मंदिर..

ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरांपैकी एक ते म्हणजे पातूर शहर..! ऐतिहासिक, पौराणिक वारसा लाभलेलं  हे शहर पावन झालयं ते अनेक धार्मिक स्थळांनी ...., निर्सगाच्या कुशित लपलेले सोपिनाथ महाराज व नानासाहेब मंदिर, उंच टेकडी परिसरावर वसलेले रेणुका माता मंदिर व पातूर शहराच्या मध्यभागी वसलेले पातूरचे आराध्य दैवत संत श्री. सिदाजी महाराज मंदिर..

आदी सर्व पातूरची ऐतिहासिक स्थळं भाविक भक्तांचे चित्त वेधून घेतात....!  शहराच्या मध्यभागी पातूर शहराचे आराध्य दैवत संत श्री.सिदाजी महाराजांचे आकर्षक व भव्य मंदिर उभारल्या गेले आहे. हे भव्य आकर्षक मंदिर १९५७ साली बांधण्यात आले असून मंदिरासोबतच भव्य असा सभा मंडपसुध्दा उभारण्यात आला आहे. अशा सुंदर व आकर्षक मंदिरात उत्कृष्ट कुशलतेने घडविलेली संत श्री.सिदाजी महाराजांची कृष्णवर्णी मूर्ती भाविक भक्तांना आकर्षूण घेते. पातूर येथिल सुप्रसिध्द शिल्पकार श्री.वामणराव वडतकार यांनी सतत दोन ते तीन वर्ष अथक परिश्रम करुन ही आकर्षक मूर्ती घडविली आहे.  

संत श्री.सिदाजी महाराजांचा जन्म सतराव्या शतकात माहोकारांच्या कुळात झाला त्यांच्या वडीलांचे नाव राघोजी माहोकार व आईचे नाव अलोकाबाई होते. संत श्री.सिदाजी महाराज हे जन्मताच अवलिया होते, परंतू त्यांचे महात्म्य लोकांना  समजले नाही. संत श्री. सिदाजी महाराजांनी अनेक अलौकिक चमत्कार दाखविल्यानंतर लोकांना महाराजांचे महात्म्य कळून चुकले. संत श्री.सिदाजी महाराज १८१२ मध्ये समाधिस्त झाले, समाधिस्त होण्याच्या दोन वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर संत सिदाजी महाराजांचा टाळ व अतिभव्य असा ध्वज उभारण्यात आला. गुढीपाडव्यापासून ते दहाव्यादिवसापर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रम घेऊन हा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. या दहादिवसाच्या कार्यक्रमाने पातूर नगरी भक्तिमय वातावरणात दुमदुमून जाते. दुरून-दुरून भाविक भक्त सिदाजी महाराजांच्या दर्शनाकरिता येतात. गुढीपाडव्यापासून दहावा दिवस म्हणजे महाराजांच्या सप्ताहाचा समारोप व भव्ययात्रा महोत्सव.

यादिवशी दुपारी १२ वाजता दहीहांडीचा कार्यक्रम साजरा केला जातो. सायंकाळी भव्यमहाप्रसादाचा कार्यक्रम विविध संघटनांच्या व नागरिकांच्या सहकार्याने साजरा केला जातो. तद्नंतर श्री.सिदाजी महाराजांची पालखी टाळ मृदुंगाच्या गजरात पातूर शहरातून निघते आणि अशा या भक्तिमय वातावरणाने पातुर नगरी दुमदमून जाते.दरवर्षीप्रमाने या वर्षीसुध्दा संत श्री.सिदाजी महाराजांच्या यात्रेच्या सप्ताहाची सुरवात दि.६ एप्रिल ला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होत असुन या सप्ताहाचा समारोप व भव्य यात्रा महोत्सव तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम दि.१५ एप्रिलला पातूर येथे साजरा होत आहे त्यानिमित्त संत श्री.सिदाजी महाराजांना कोटी कोटी दंडवत...!

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News