आयुष्यातील चुका...

दिगंबर कोटकर
Saturday, 18 May 2019

इथे वेदना मनाला रोजच छळते
जुनी जखम पुन्हा भळभळते,
आठवांचा या विरही मनमयुर
नि ती वेडी माझ्यासाठी झुरते...

सर्वच मनासारखे घडत नाही
सर्वांचेच विचार येथे जुळत नाही,
नात्यात हवा असतो फक्त विश्वास
एकदा तुटला की पुन्हा जुळत नाही...

कदर करतो आपण भावनांची
पण आपल्यांना ते कळत नाही,
मग आपल्या आयुष्याचा पतंग
बेभान भरकतो दिशा दाही...

इथे वेदना मनाला रोजच छळते
जुनी जखम पुन्हा भळभळते,
आठवांचा या विरही मनमयुर
नि ती वेडी माझ्यासाठी झुरते...

कळते सर्व पण विचार जुळत नाही
समजूतदार असेल वाटले पण तसे नाही,
टाळी एका हाताने कधी वाजते का?
पण संशयाचे भूत खाली उतरत नाही...

द्वेष का? जन्म घेतो मनात
याच कारण कधी शोधले का?
जीवन म्हणजे सुख नि दुःख
गत आयुष्यातील हजारो चुका...

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News