'देव द्या, देवपण घ्या' हा उपक्रमात सहभागी व्हा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 August 2020

'देव द्या, देवपण घ्या' हा उपक्रमात सहभागी व्हा

'देव द्या, देवपण घ्या' हा उपक्रमात सहभागी व्हा

नाशिकमध्ये विद्यार्थी कृती समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गोदापार्कच्या जवळ मंगळवारी 'देव द्या, देवपण घ्या' हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमाचे हे दहावे वर्ष असून यंदाही विद्यार्थी कृती समितीचे स्वयंसेवक मास्कचा वापर करुन सोशल डिस्टन्सिंगचे तत्त्व पाळत या उपक्रमात सहभागी होणार आहेत. या उपक्रमांतर्गत गणेश मंडळाच्या ६ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या व घरगुती गणेशोत्सवातील मुर्ती संकलित करण्यात येतात.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांचे चिरंजीव आकाश पगार यांनी सन २०१० मध्ये या उपक्रमास सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी समितीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गोदापार्क येथे उभा राहून मुर्ती व निर्माल्य गोळा करतात. त्यानंतर त्या महापालिकेकडे सुपूर्द करण्यात येतात. दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे प्रदूषण होऊ नये यासाठी हा उपक्रम राबविला जात असून या पर्यावरणपूरक उपक्रमाबद्दल विद्यार्थी कृती समितीचे खासदार सुप्रिया सुळेंनी अभिनंदन केले आहे. या उपक्रमाला नाशिककरांनी मोठया संख्येने प्रतिसाद अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली आहे.
 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News