राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सचिव पदी परमेश्वर इंगोले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेबूब शेख यांनी बुधवारी (ता.04) पक्ष कार्यालयात नियुक्ती पत्र दिले.     

मुंबई: हाडाचा कार्यकर्ता परमेश्वर इंगोले पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी एकमुखाने निवडण करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेबूब शेख यांनी बुधवारी (ता.04) पक्ष कार्यालयात नियुक्ती पत्र दिले.     

परमेश्वर इंगोले यांनी विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक, शेतकरी यांच्या प्रश्नावर सरकारच्या विरोधात आवाज उठवला होता. सामाजिक समस्यांसाठी वेळोवेळी आंदोलन, मोर्चे, उपोषण केली होती. त्याच्या सामाजिक, राजकीय कार्याची दखल घेऊन शरद पवार यांनी एक बैठक बोलावली होती. पक्षाला बळकट करण्यासाठी परमेश्वर इंगोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.  

आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार राजू नवघरे, आमदार आदिती ताई नलावडे, संजय बोरजे, राष्ट्रवादी सेल प्रदेशअध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, प्रदेश अध्यक्ष मेहुबब शेख, रविकांत वरपे, सुरज चव्हाण आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परमेश्वर यांचे स्वागत केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News