'या' चित्रपटातून परिणिती-अर्जुन पुन्हा एकत्र

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा ‘इश्‍कजादे’ आणि ‘नमस्ते इंग्लंड’सारख्या चित्रपटात एकत्र झळकले.

अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा ‘इश्‍कजादे’ आणि ‘नमस्ते इंग्लंड’सारख्या चित्रपटात एकत्र झळकले. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पसंतीस पडली. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘संदीप और पिंकी फरार’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर परिणिती आणि अर्जुनने  सोशल मीडियावर शेअर केले आहे.

या पोस्टरवरून अर्जुन पिंकी दहिया ही भूमिका साकारत असून परिणिती संदीप कौरची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. या आगळ्या-वेगळ्या कथेचे दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी यांनी केले आहे. हा चित्रपटकथा ब्लॅक कॉमेडी असणार असून २० मार्च रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News