पालकांमुळे विद्यार्थांची कोचिंग शिक्षणाची मानसिकता असते..!

रसिका जाधव (सकाळ वृत्तसेवा - यिनबझ)
Thursday, 20 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • महाविद्यालयात चांगले शिक्षण दिले जाते.
  • परंतु पालकांना वाटते की, एक शिक्षक एकावेळी अनेक मुलांना शिक्षकवणार आणि ते पण फक्त ३० ते ४० मिनिटे मग त्यात मुलांना काय समजणार असे पालकांना वाटते.

मुंबई :- महाविद्यालयात चांगले शिक्षण दिले जाते. परंतु पालकांना वाटते की, एक शिक्षक एकावेळी अनेक मुलांना शिक्षकवणार आणि ते पण फक्त ३० ते ४० मिनिटे मग त्यात मुलांना काय समजणार असे पालकांना वाटते. पालकांना वाटत की, आपल्या मुलांच्या अभ्यासकडे महाविद्यालयातील शिक्षक व्यक्तिक लक्ष दिले जाणार नाही म्हणून पालकांनी विद्यार्थांना कोचिंग क्लासला जाण्याची सवय लावली आहे. विद्यार्थाला देखील महाविद्यालयात असताना शिक्षक काही शिकवत असताना समजलं नाही तर, त्याला शिक्षकाला संपूर्ण वर्गात विचारण्याची लाज वाटते. मग विद्यार्थी कोचिंग शिक्षणाकडे वळताना दिसतात. महाविद्यालयाचे चांगले शिक्षण सोडून, कोचिंगचे शिक्षण घेण्याकडे आपल्या सर्वांचा कल अधिक असतो.. अशी आपली सर्वांची मानसिकता का असते...!  याच विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपवर मनोसत्त्क चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.
 

मला तरी वाटतय की, ही मानसिकता तयार केली खर तर पाहता सरकारी शाळा आणि कॉलेज मध्ये शिक्षक हे ज्ञानी असतात पण ते आपल ज्ञान विद्यार्थांना देत नाहीत. मग अशा वेळेस होय काय की पालक आपल्या मुलांना कोचिंग क्लासला पाठवतात त्यांत असे ही आढळून येते की, कोचिंग क्लास हे त्याच शिक्षणकाचे पण असतात. इथे अजून एक मुद्दा आहे, विद्यार्थी शाळा, कॉलेजला त्यांची शिकण्याची मनस्थिती पण नसते कारण ते आपल्या फी मिळते. यात अस पण होते की, जर एखाद्या कोचिंग क्लासचा विद्यार्थीचा नंबर आला की, त्यांचे दोन चार बेनर लावता त्याचा उदोउदो होतो मग पालक आकर्षित होतात, मग कोंचिन क्लासच महत्व वाढत.

-सागर वाघ

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News