परंडा किल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 August 2020
  • हा किल्ला केव्हा बांधला गेला याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत परंतु असे समजले जाते की, बहामनी सुलतानांचा वजीर महमूद गावानने हा किल्ला सुमारे १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला.
  • इ.स. १५९९ मध्ये मुघल सैन्य अहमद नगरच्या निजाम शहाला हरवण्यात यशस्वी ठरले.

हा किल्ला केव्हा बांधला गेला याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत परंतु असे समजले जाते की, बहामनी सुलतानांचा वजीर महमूद गावानने हा किल्ला सुमारे १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला. इ.स. १५९९ मध्ये मुघल सैन्य अहमद नगरच्या निजाम शहाला हरवण्यात यशस्वी ठरले. जरी मुघल जिंकले असले तरी निजाम शाहीच्या सरदारांनी वयाने लहान अशा मुर्तुजा निजाम शहाच्या नावाने राज्य चालविण्याचा निर्णय घेतला आणि नविन राजधानी म्हणून अहमद नगरच्या आग्नेयेला सुमारे ८० मैलांवर असलेल्या परंडा किल्ल्याची निवड केली. काही कालावधीसाठी परंडा राजधानी राहिली. इ.स. १६३० च्या सुमारास हा किल्ला शहाजी महाराजांच्या ताब्यात होता नंतर पुन्हा तो मुघलांकडे गेला आणि सरतेशेवटी हैद्राबादच्या निजामाकडे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत राहिला.

हा किल्ला लष्करी वास्तुकला आणि सैन्य-अभियांत्रिकी वैशिष्ट्यांसाठी प्रसिध्द आहे. याच किल्ल्यात प्रसिध्द अशी ‘मुलुख मैदान तोफ’ होती. विजापूरच्या आदिल शहाच्या मुरार नावाच्या सरदारने ही तोफ विजापूरला नेली. परंडा किल्ल्यात प्राचीन महादेव मंदिर आणि नरसिंह मंदिर तसेच एक मशिद आहे. परंडा किल्ल्यातील पाच फूट उंच आणि सहा हातांच्या गणेशाची नृत्यमुद्रेतील मूर्ती आगळीवेगळी आहे. त्या शेजारच्या आदिशेष तीर्थंकाराच्या मूर्ती असून आज भग्नावस्थेत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News