पापाराजीकडून प्रेरणा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 28 February 2019

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या प्रत्येक चित्रपटातील भूमिकेसाठी फार मेहनत घेताना दिसतो. त्याची ही मेहनत रुपेरी पडद्यावरही दिसून येते. नवाज सध्या त्याच्या आगामी ‘फोटोग्राफ’ चित्रपटाच्या तयारीला लागला आहे.

या चित्रपटात तो एका फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याने खऱ्या आयुष्यातील पापाराजींकडून प्रेरणा घेतली आहे. पापाराजी म्हणजेच ख्यातनाम व्यक्तींची छायाचित्रे घेण्याचा छंद असलेला छायाचित्रकार.

रितेश बत्रा यांचा हा चित्रपट मुंबईतील पापाराजी फोटोग्राफर यांनाच समर्पित केला आहे. नवाजने या छायाचित्रकारांची मेहनत आणि काम पाहता त्यांच्याकडूनच फोटोग्राफरच्या भूमिकेसाठी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला आहे.

या चित्रपटात सान्या कॉलेज कुमारीच्या भूमिकेत दिसेल. नवाज-सान्याची अनोखी प्रेमकथा यामध्ये पाहायला मिळणार आहे. नवाज-सान्याचा हा चित्रपट येत्या १५ मार्चला बॉक्‍स ऑफिसवर दाखल होणार आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News