‘पंगा’ चित्रपटातसाठी पंकजची नकारात्म भूमिका 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 6 January 2020

मात्र ‘सेक्रेड गेम्स’ या बेवसीरिजमुळे तो जास्त प्रकाशझोतात आला. सध्या पंकज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

अभिनेता पंकज त्रिपाठी ‘स्त्री’, ‘लुका चुपा’, ‘अर्जुन पटियाला’सारख्या बॉलीवूडमधील अनेक चित्रपटात झळकला. मात्र ‘सेक्रेड गेम्स’ या बेवसीरिजमुळे तो जास्त प्रकाशझोतात आला. सध्या पंकज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

तो ‘पंगा’ चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा होती; मात्र आता त्याने या चित्रपटातून एक्‍झिट घेतली आहे. पंकज सध्या ‘८३’, ‘लूडो’, ‘गुंक्‍सेनाः द कारगील गर्ल’ या चित्रपटात व्यस्त असल्याने त्याला या चित्रपटासाठी वेळ देता येणार नाही. त्यामुळे त्याने या चित्रपटातून माघार घेतली आहे.

‘पंगा’ चित्रपटात अभिनेत्री कंगना रानौत मुख्य भूमिकेत असून तिच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री नीना गुप्ता, रिचा चड्डा, अभिनेता जसी गिल आदी कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शक अश्‍विनी अय्यर तिवारी यांनी पंकजला या चित्रपटातील एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी त्याची निवड केली होती.

यासाठी पंकजने होकार दिला होता; मात्र पंकजने चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटातून माघार घेतली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News