पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर वर्णी ?

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Saturday, 15 February 2020

आगामी विधानपरिषदेची निवडणूक ही  एप्रिल महिन्यात होत असून एकूण ८ जागांसाठी ही  निवडणूक होणार आहे.

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथय मुंडे यांच्या कन्या आणि माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजत आहे ते म्हणजे त्यांच्या नाराजीनाट्यामुळे. परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा धक्कादायक रित्या तेसुद्धा  तब्बल ३१ हजार मतांच्या फरकाने  पराभव झाला. हा आपला पराभव पक्षातील स्वकीयांनीच केला असल्याचा गंभीर असा आरोप केला. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

महाराष्ट्राच्या नाराज नेत्यांनी एक वेगळी अशी फळीच पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली उभी केली होती असे समजते.त्यामुळे पक्षाला आणखी दगाफटका बसू नये म्हणून भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने आणि केंद्रीय नेतृत्वाने याची गंभीर दखल घेतली आहे.पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी देणार असल्याचं समजतंय.

आगामी विधानपरिषदेची निवडणूक ही  एप्रिल महिन्यात होत असून एकूण ८ जागांसाठी ही  निवडणूक होणार आहे. रिक्त होणाऱ्या जागांमध्ये पंकजा मुंडेंच्या यांच्या नावाचा समावेश होऊ शकतो अशी खात्रीलायक माहिती असल्याचं सूत्रांकडून समजतंय.

आजपासून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे ह्या अधिवेशनात पंकजा मुंडे यांच्या नावावर ऐकमत होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पंकजा मुंडे याना मानणारा वर्ग आहे. त्यांच्यासारखे नेतृत्व गमावणे सध्या तरी भारतीय जनता पक्षाला परवडणारे नाही म्हणून पंकजा मुंडे यांचे लवकरच पुनर्वसन होणार अशी चर्चा आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News