या पन्हाळगडच्या मसाई पठारवर या महिन्यात जाऊन या...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 4 May 2019

घनदाट जंगल, उंच डोंगरकडा, डोळे भिरभिणारी दरी अशा नैसर्गिक अडथळ्यांवर मात करीत अंधाऱ्या रात्री मोजक्‍या मावळ्यांसह शिवाजी महाराज विशाळगडी मार्गस्थ झाले. याच इतिहासाचा साक्षीदार पन्हाळगड.

बलाढ्य सैन्यबळ घेऊन सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्पकतेच्या बळावर हा वेढा भेदला आणि विशाळगडाकडे कूच केली. घनदाट जंगल, उंच डोंगरकडा, डोळे भिरभिणारी दरी अशा नैसर्गिक अडथळ्यांवर मात करीत अंधाऱ्या रात्री मोजक्‍या मावळ्यांसह शिवाजी महाराज विशाळगडी मार्गस्थ झाले. याच इतिहासाचा साक्षीदार पन्हाळगड.

त्या लगतच असलेल्या मसाई पठार परिसरातून महाराज विशाळगडावर मार्गस्थ झाले. तेच मसाई पठार इतिहास काळापासून आपली भव्यता, दिमाख टिकवून आहे. पर्यटक पन्हाळगड पाहून जातात. गडाकडे जाताना थोडी वाट वाकडी करून आपटी व जेऊर गावामार्गे मसाई पठारकडे जाता येते. अवघे पाच-सहा किलोमीटर अंतर आहे. गड पायथ्यापासून जेऊरच्या रस्त्याने जाताना वर पाहताच सज्जा कोटी व बाजूचे दोन बुरूज दिसतात.

अवतीभोवती झाडी-झुडपे, दगड-गोठे व मोठे घाटसदृश वळण पार केले, की धनगरवाडा लागतो. दगडी उंबरठ्यांची ५०-६० घरे ओलांडली की चढाव लागतो. तेथून मसाई पठार सुरू होते. ४० एकरांचा उंच डोंगरावरील सपाट भूप्रदेश, सूर्योदय व सूर्यास्ताचे विलोभनीय नेत्रसुख घ्यावे तेही इथेच. पावसाळ्यात हिरवेगार गवत, उन्हाळ्यात गवत वाळून पठाराने पिवळसर शाल पांघरल्याचा भास येतो. वारे ताशी १२० कि.मी. वेगाने घोंगावतात.

 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News