पोलिसांची शौर्यगाथा सांगणारी 'पांडू' वेबसीरिज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 16 May 2020
  • यामध्ये मुंबई पोलिसांचे दैनंदिन आयुष्य दाखवण्यात आले आहे.

आपल्या सुरक्षेसाठी पोलिस दिवस-रात्र झटत असतात. ऊन असो की पाऊस... ते आपले कर्तव्य बजावत असतात. आपल्या कुटुंबाला फारसा वेळ न देता आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेची ते काळजी घेत असतात. कोणत्याही सण-समारंभाला ते आपली ड्युटी बजावत असतात. ते कर्तव्य बजावत असतात म्हणून आपण घरी सुरक्षित असतो. अशाच पोलिसांच्या शौर्याची गाथा सांगणारी "पांडू' ही वेबसीरिज एमएक्‍स प्लेअरवर पाहायला मिळेल. यामध्ये मुंबई पोलिसांचे दैनंदिन आयुष्य दाखवण्यात आले आहे. यामध्ये अभिनेता सुहास शिरसाट आणि दीपक शिर्के मुख्य भूमिकेत आहेत.

सुहास आणि दीपक भूमिका साकारत असलेल्या दोन धाडसी पोलिसांची ही कथा आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहराचं रक्षण करणं ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे मुंबई पोलिस दिवस-रात्र निगराणी करत असतात. विशेष म्हणजे यात वर्दी असताना आणि नसताना त्यांचं जीवन कसं असतं, यावरही भाष्य केलं आहे. पोलिससुद्धा तुमच्याआमच्यासारखा एक माणूसच आहे, याचं दर्शन घडतं. पोलिसांचे कधीही न पाहिलेले जीवन या वेबसीरिजच्या माध्यमातून अधोरेखित केलं आहे.

पोलिसांच्या आयुष्यावर बरेच चित्रपट आणि टीव्ही मालिका आल्या असल्या तरी ही वेबसीरिज वेगळी आहे. ही कथा आपल्या मनाला भिडणारी आहे. दीपक शिर्केसारखा अनुभवी कलाकार आणि "रात्रीस खेळ चाले' या मालिकेद्वारे घरोघरी पोहोचलेला अभिनेता सुहास शिरसाट यांनी आपापल्या भूमिका सहज साकारल्या आहेत.

या वेबसीरिजचे बरेचसे चित्रीकरण पोलिस व्हॅनमध्ये झाले आहे. वेबसीरिजचे दिग्दर्शन सारंग साठे आणि अनुषा नंदा कुमार यांनी केले आहे. वेबसीरिजचे एकूण सहा एपिसोड्‌स आहेत. आणि ही वेबसीरिज एमएक्‍स प्लेअर ओरिजनलवर पाहता येणार आहे.
- स्नेहल सांबरे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News