वारी पंढरीची

डॉ. संदीप क्षीरसागर 
Friday, 12 July 2019

पंढरीची वारी म्हणजे प्रत्येकाच्या मनात अक्षरशः माऊली आणि संत वास्तव्यास येतात, तेंव्हा ही वारी चालू होते.

"आयुष्य" म्हणजे" पंढरीची वारी "
कष्ट हे 'पंढरीचा कळस' ........ 
चाललो अनवाणी.... 
मनी नाही आळस ||

अज्ञानालाही ज्ञान देतो ज्ञानोबा"...
अवघड जरी असला 
मार्ग सोप्पा करीतो " सोपान "... 
या संसाराच्या गराड्यातुनी
घ्यावी थोडी " निवृत्ती".... 
जाती-पातीच्या, सुख-दुःखाच्या 
"रिंगणातुनी "मुक्त करिते" मुक्ताई"

जरी तु सावळा
"नाम" तुझे पांडुरंग... 
संगे घेऊनी चाललो, टाळ विणा मृदुंग.... 
"तुका"म्हणे.. 
तुझ्या नावात होऊनी दंग, 
आम्हां काळजी न भुकेची... 
प्रत्येक हृदयी" सावता माळी "

जसा पांडुरंग.... 
जिव्हेलाही न तहानेचा भार, 
ओल्या मडक्यातही भरीले पाणी, 
तो संत गोरा कुंभार.... 
इथऽ....

प्रत्येकाच्या हृदयात वसला पांडुरंग... 
अशी निघाली ही संतांची स्वारी 
मनापासून एकदा तरी करावी.. 
" ही पंढरीची वारी "

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News