‘अग्निहोत्र २’ मालिकेमध्ये पल्लवीची एंट्री

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 7 January 2020

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अग्निहोत्र २’ मालिकेमध्ये पल्लवीची एंट्री होणार आहे. या मालिकेमधील भूमिकेसाठी ती सध्या नवनवीन गोष्टी शिकत आहे. संगीता नावाचं पात्र ती या मालिकेमध्ये साकारणार आहे.

अभिनेत्री पल्लवी पाटील मराठी मालिकांमधून घराघरांत पोहचली. तिने साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता पल्लवी एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अग्निहोत्र २’ मालिकेमध्ये पल्लवीची एंट्री होणार आहे.

या मालिकेमधील भूमिकेसाठी ती सध्या नवनवीन गोष्टी शिकत आहे. संगीता नावाचं पात्र ती या मालिकेमध्ये साकारणार आहे. ती म्हणते, ‘संगीता ही गोव्यात वाढलेली मुलगी आहे. या पात्रासाठी सध्या मी गोवन भाषा शिकत आहे.

शिवाय जॅपनिस, रशियन काही शब्दही मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाय माझा यातील लूकही यामध्ये पूर्ण वेगळा आहे.’ या मालिकेच्यानिमित्ताने पल्लवीला तिच्या चौकटीबाहेरील भूमिका साकारायची संधी मिळाली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News