धोनीच्या 'त्या' ग्लोव्हजवरून 'नापाक' मंत्री काय म्हणतोय, एकदा पाहाच !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019
  • ग्लोव्हजवर अर्धसैनिक दलाचं - 'बलिदान ब्रिगेड'चं मानचिन्ह
  • पाक मंत्र्याची ट्विटरवरून तिखट प्रतिक्रिया

मुंबई : वर्ल्डकप २०१९ दरम्यान भारतीय टीमचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीचा एक वेगळाच अंदाज मैदानात दिसला.  पहिल्या सामन्यातच यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी चर्चेत आला तो त्याच्या हातातील खास ग्लोव्ह्जमुळे. त्याच्या ग्लोव्ह्जवर असणाऱ्या  'बलिदान'च्या मानचिन्हामुळे या चर्चा झाल्या. यावर झालेल्या वादानंतर आयसीसीनं त्यावर आक्षेप घेत 'धोनीने त्याच्या ग्लोव्हजवरून हे मानचिन्ह काढून टाकावं', असे आदेश दिले आहेत. परंतु, या दरम्यान धोनीच्या या कृत्याच्या प्रतिक्रिया पाकिस्तानातूनही दिसून आल्या. पाकिस्तानच्या इमरान खान सरकारमधले एक मंत्र्यानंही याबद्दल ट्विटरवरून तिखट प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

 

'धोनी इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळायला गेलाय, महाभारत नाही' 

पाकिस्तान सरकारमधील विज्ञानमंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी ट्विटरवर 'धोनी इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळायला गेलाय, महाभारत नाही. भारतीय मीडियात हा काय वाद सुरू आहे. मीडियाचा एक वर्ग युद्धासाठी एवढा उतावळा आहे की त्यांना सीरिया, अफगाणिस्तान किंवा रावंडाला धाडायला हवं' अशी प्रतिक्रिया नोंदवली.  

बीसीसीआयकडून धोनीची पाठराखण

आयसीसीकडूनही आक्षेप घेण्यात आला असला तरी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने मात्र धोनीची पाठराखण करत यात काहीच वावगं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. याप्रकरणी आता बीसीसीआयचे सीईओ राहुल जौहरी इंग्लंडला जाऊन आयसीसीच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.  बीसीसीआयकडून धोनीची पाठराखण करत लेखी स्वरूपात आयसीसीला याविषयीची माहिती देण्यात आली. यापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी बीसीसीआयच्या एका बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News