मुळ पाकिस्तानी असलेला अमेरिकेचा 'हा' खेळाडू प्रथमच IPL मध्ये खेळणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 13 September 2020

क्रिकेटर अली खान मुळ पाकिस्तानी आहे. 2009 त्याचे कुटुंब अमेरिकेला स्थाईक झाले. सुरुवातीला 2019 साली कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये खेळाला. आणि चमकदार कामगिरी केली. पहिल्याच बॉलवर धडाकेबाज फलंदार कुमार संघकाराचा विकेट चटकावला.

मुंबई : प्रेक्षकाविना होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये प्रथमच अमेरिकेच्या खेळाडूला स्थान मिळाले आहे. त्यामुळे आयपीलच्या इतिहास अमेरिकेच्या खेळूचे नाव कोरले जाणार आहे. कोलकत्ता नाईट रायडर्सचा खेळाडू पॉलर हॅरी गर्नी दुखापतीमुळे जखमी झाला. त्याच्या जागेवर अमेरिकचा वेगवान बॉलर अली खान खेळणार आहे. मात्र अमेरिकेच्या गव्हर्निग ऑफ कोन्सिलने मान्यता देणे बाकी आहे. त्यामुळे सध्यातरी हा प्रश्न अनुउत्तीर्ण आहे. 

क्रिकेटर अली खान मुळ पाकिस्तानी आहे. 2009 त्याचे कुटुंब अमेरिकेला स्थाईक झाले. सुरुवातीला 2019 साली कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये खेळाला. आणि चमकदार कामगिरी केली. पहिल्याच बॉलवर धडाकेबाज फलंदार कुमार संघकाराचा विकेट चटकावला. त्यामुळे काही दिवस चर्चेत होता. मात्र सराव दरम्यान दुखपत झाल्यामुळे गंभीर अली  गंभीर जखमी झाला. त्यामुळे दोन वर्षे विश्रांती घ्यावी लागली. 2018 साली अलीने कॅनडा टी20 लीगमध्ये प्रतिस्पर्धीच्या तोंडाचे पाणी पळवले. 8 मॅचमध्ये 10 विकेट चटकावले. त्यामुळे खानची मागणी वाढली. त्रिनबोगो नाईट रायडर्नसने खानला विकत घेतले. त्यावेळी 12 मॅटमध्ये 16 विकेट घेण्याचा विक्रम खानने केला. त्यांच्या संघाने कप जिंकला.

आयपीएल संघात फक्त चार विदेशी खेळाडूना खेळू शकतात. त्यामुळे पहिल्या अकरा खेळाडूंमध्ये शाननचा नंबर लागणे कठीन आहे. खानपैक्षा अनुभवी इयोन मॉर्गन, सुनील नरेन, आद्रे रसेल आणि पॅट कमिन्य हे खेळाडू आहे. त्याचबरोबर टॉम बेंटन, क्रिस ग्रीन आणि लॉकी फर्ग्युसनसारखे विदेशी खेळाडू कोलकत्ता नाईट रायडर्समध्ये आहेत. 

प्रेक्षकाविना स्टेडीयम चमकणार

यंदा प्रेक्षकाविना आयपीएल खेळले जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची कमी भरुन काढण्यासाठी खुर्च्यावर डमी प्रक्षक ठेवले जाणार आहे. तसेच म्युझिक सिस्टम आणि मोठे स्कीन स्टेडीयममध्ये लावले जातील. चौकार, शटकार, आऊट झाल्यानंतर चेयरगर्ल स्किनवर डान्स करताना दिसतली. त्यासाठी चेयरगर्लकडून काही व्हिडीओ शुटींग करुन घेण्यात आले. तसेच खेळाडूंचे काही शॉर्ट व्हिडीओ यावेळी दाखवले जाणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News