हे उपाय करा आणि शरीरावरील टॅटू किंवा गोंदण मिटवा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 April 2019
आजकाल सर्व तरुण-तरुणींमध्ये हातावर टॅटू काढण्याचे क्रेझ आहे. काही जण मानेवर, पाठीवर, हातावर तर काही जण पूर्ण शरीरावर काढतात. हे काढण्यासाठी जितके पैसे द्यावे लागतात, त्याच्यापेक्षा जास्त पैसे ते मिटवण्यासाठी द्यावे लागतात.

आजकाल सर्व तरुण-तरुणींमध्ये हातावर टॅटू काढण्याचे क्रेझ आहे. काही जण मानेवर, पाठीवर, हातावर तर काही जण पूर्ण शरीरावर काढतात. हे काढण्यासाठी जितके पैसे द्यावे लागतात, त्याच्यापेक्षा जास्त पैसे ते मिटवण्यासाठी द्यावे लागतात.

कधी हौस म्हणून किंवा कधी परंपरेचा एक भाग म्हणून शरीरावर टॅटू किंवा गोंदण गोंदवला जातो. पण व्यवसायाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक कारणांमुळे कालांतराने टॅटू मिटवणे गरजेचे होते. टॅटू शरीरावर गोंदवणे हे जरी थोडे त्रासदायक वाटत असले तरिही ते मिटवणे आता शक्य आहे. ते ही अगदी वेदनारहित मार्गाने.

तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे लेझर ट्रीटमेंट्समध्येही नवनवे प्रयोग करण्यात आले आहेत. सौंदर्यशास्त्रात आता कमीत कमीत त्रासात अधिकाधिक सुकर सोयी लेझर ट्रीटमेंट्समुळे शक्य झाल्या आहेत. मग टॅटू मिटवण्याची वापरण्यात येणारे आधुनिक काही उपाय जे केल्याने तुमचा कायमस्वरूपी टॅटूही जाऊ शकतो.टॅटू काढण्यासाठी स्विच्ड लेझर नामक टिट्रमेंट करावी लागते. त्यामध्ये लेझरच्या साहाय्याने त्वचेवर पसरलेली शाई जाळण्यात येते. मग टॅटू पूर्णपणे काढून टाकण्यासाठी तुम्हाला ६ ते ८ वेळा लेझर टिट्रमेंट घ्यावी लागते. यासाठी साधारणपणे ३00 ते ५00 रुपयांपर्यंत खर्च येतो.

टॅटू काढण्यासाठी या गोष्टी करा :

काही पार्लरमध्ये टॅटू काढण्यासाठी प्रति स्क्वेअर इंच खर्च येतो. यासाठी २-३ वेळा जावे लागते.

सर्जरीद्वारेही टॅटू काढला जातो. मात्र, याचा खर्च या टॅटूवर अवलंबून असतो. साधारणपणे याला १५-२0 हजारही खर्च लागू शकतो.

टॅटू काढण्यासाठी कुशल सर्जन व लेझर मशीनची गरज असते, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

टॅटू काढण्यासाठी बाजारात वेगवेगळी साधने, क्रिम उपलब्ध असतात. यामुळे टॅटू कधीही जात नसून तुमच्या त्वचेला नुकसान पोहचू शकते. त्यामुळे या क्रिमचा वापर करू नये.

या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गोंदण आणि टॅटू काढा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News