पद्मश्री विखे पाटील तंत्रनिकेतनमध्ये ‘टेक्‍नो फेस्ट’ सोहळा संपन्न

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कृतिशीलता विकसित करण्याचे काम येथे होते. प्रवरेत दर्जेदार विद्यार्थी घडतात : प्रा. दशरथ मगर

लोणी : सर्वांगीण विकासासह पद्मश्री विखे पाटील तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेलाही मोठा वाव दिला जातो. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कृतिशीलता विकसित करण्याचे काम येथे होते. प्रवरेत दर्जेदार विद्यार्थी घडतात, असे प्रतिपादन विखे पाटील तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. दशरथ मगर यांनी केले.

पद्मश्री विखे पाटील तंत्रनिकेतनमध्ये ‘टेक्‍नो फेस्ट’ अंतर्गत राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन, प्रोजेक्‍ट, प्रश्नमंजूषा, पोस्टर प्रेझेंटेशन आदी स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात मगर बोलत होते. प्रा. सोमनाथ लव्हाटे, प्रा. राजेंद्र साबळे, प्रा. नामदेव गरड, प्रा. राजेंद्र बेलकर, प्रा. दिगंबर शिरसाठ, माजी विद्यार्थी व उद्योजक निखिल लुणे, धनंजय दिवटे उपस्थित होते. यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.  

पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत प्रथम पारितोषिक संजीवनी तंत्रनिकेतन, कोपरगाव व विखे पाटील तंत्रनिकेतन (लोणी), द्वितीय पारितोषिक संजीवनी तंत्रनिकेतन, कोपरगाव व विखे पाटील तंत्रनिकेतन आणि तृतीय क्रमांक संगमनेर येथील अमृतवाहिनी तंत्रनिकेतन व विखे पाटील तंत्रनिकेतन संघांना विभागून मिळाले.

प्रोजेक्‍ट स्पर्धेत वामनराव इथापे तंत्रनिकेतन, अमृतवाहिनी तंत्रनिकेतन, संगमनेर, विखे पाटील तंत्रनिकेतन, लोणी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. प्रोजेक्‍ट सॉफ्ट ब्रॅंच स्पर्धेत काकासाहेब वाघ तंत्रनिकेतन, नाशिक, एम. आय. टी. तंत्रनिकेतन, येवला, विखे पाटील तंत्रनिकेतन, लोणी व चांदवड तंत्रनिकेतन यांनी अनुक्रमे बक्षिसे मिळविली.
प्रश्नमंजूषा स्पर्धेत संजीवनी तंत्रनिकेतन, कोपरगाव (प्रथम), अमृतवाहिनी तंत्रनिकेतन, संगमनेर (द्वितीय), विखे पाटील तंत्रनिकेतन, लोणी (तृतीय). पोस्टर स्पर्धेत संजीवनी तंत्रनिकेतन (प्रथम), काकासाहेब वाघ तंत्रनिकेतन, नाशिक (द्वितीय), संजीवनी तंत्रनिकेतन (तृतीय).

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News