देशाच्या बजेटपेक्षा 'या' 63 अरबपतींकडे आहे जास्त पैसा; म्हणून देशाची गरिबीकडे वाटचाल

यिनबझ टीम
Tuesday, 21 January 2020

2018-19 मध्ये निर्मला सितारामन यांनी देशाचं बजेट सादर केलं जे 24 लाख 42 हजार 213 करोट इतकं होतं, पण एका रिपोर्टमध्ये एक धक्कादायक खुलासा झाला आहे की वरील रकमेपेक्षा अधीक रक्कम तर देशातल्या 63 अरबपतींकडे आहे.

देशातल्या ऑक्सफॅम इंटरनॅशनलने भारताच्या अर्थव्यवस्थेला घेऊन एक रिपोर्ट सादर केला आहे. या अहवालामध्ये सलग तीन वर्षे श्रीमंत असलेल्यांची यादी जाहिर झाली आहे. यामध्ये ठळकरित्या असे स्पष्ट केले आहे की भारतात श्रीमंत लोक अधीक श्रीमंत होत आहेत आणि गरीब लोक आणखी गरीब झाले आहेत.

2019 मध्ये या अहवालात असे दिसून आले की देशातील एक टक्का सर्वोच्च श्रीमंत लोक दरदिवशी २२०० कोटी रुपये कमवतात, तर 2018 मध्ये याच अहवालात असे सांगितले होते की भारतातील एक टक्के लोकांकडे देशाच्या संपूर्ण संपत्तीपैकी 73 टक्के संपत्ती आहे. म्हणजेच, जर 100 लोक देशात राहतात आणि देशाकडे एकूण 1000 रुपये असतील तर त्यातले 730 रुपये तर फक्त एका श्रीमंत व्यक्तीकडेच आहेत आणि उर्वरित 270 रुपये बाकीच्या 99 लोकांमध्ये विभागले गेले आहेत. ते देखील असमानरित्या.

ऑक्सफॅम इन इट्स टाईम टू केअर रिपोर्टमधील महत्वाचे मुद्दे

1) भारतातील एक टक्का श्रीमंत लोकांची संपत्ती एका वर्षात 46 टक्क्यांनी वाढली आहे तर 50 टक्के गरीब लोकांच्या संपत्तीत फक्त 3 टक्क्यांची वाढ झाली आहे.

2) देशातील त्या एक टक्का सर्वोच्च श्रीमंत लोकांची संपत्ती ही देशातल्या 70% टक्के म्हणजेच 95 कोटी लोकांच्या संपत्तीपेक्षा चार पट अधिक आहे.

3) देशातील सर्वात श्रीमंत फक्त नऊ लोकांकडे जितकी संपत्ती आहे, ती देशातल्या 50 टक्के गरीब लोकांच्या एकूण संपत्तीइतकीच आहे.

ऑक्सफैमने सांगितलेला उपाय
1) जीडीपीच्या 2 टक्के गुंतवणूक जर देखभाल अर्थव्यवस्थेत केली तर ती 10 लाख नवीन रोजगार निर्माण  होऊ शकतात.

2) महिलांवरील बिना पगारी कामाचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने आवश्यक त्या रचनेत गुंतवणूक करण्याची गरज आहे. पाणी, स्वच्छता, वीज, मुलांची काळजी आणि आरोग्य सेवांमध्ये जास्त गुंतवणूक असावी, जेणेकरून या क्षेत्रांमध्ये महिलांना रोजगार मिळेल.

3) पुरुषांना पैटरनिटी म्हणून तीन महिन्यांची रजा मिळावी, जेणेकरून मुलांच्या काळजीची जबाबदारी समसमान केली जाऊ शकते.

4) ऑक्सफॅम इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ बिहार यांनी असेही म्हटले आहे की जे पालक, मुले किंवा आजारी असलेल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेतात त्यांनाही रोजीरोटी मिळाली पाहिजे.

अशा छोट्यामोठ्या उद्योगांमुळे देशातला पैसा सगळीकडे वाटला जाईल आणि देशाची अर्थव्यवस्था समतोल राहील, असेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News