ओएन मॉर्गन इंग्लंड संघाचे नेतृत्व करणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 July 2020

फिरकीपटू गोलंदाज व अष्टपैलू मोईन अली यांच्याकडे आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाचे उपकर्णधार सोपविण्यात आले आहे.

लंडन : फिरकीपटू गोलंदाज व अष्टपैलू मोईन अली यांच्याकडे आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाचे उपकर्णधार सोपविण्यात आले आहे. त्याचबरोबर या मालिकेसाठी बाटलरच्या अनुपस्थित ओएन मॉर्गन इंग्लंड संघाचे नेतृत्व करणार आहे. साऊथॅंम्पटनच्या एजस बाऊलमध्ये 30 जुलै, 1 ऑगस्ट आणि 4 ऑगस्ट या तीन दिवशी इंग्लंड आयर्लंडविरुद्ध बंदराआड म्हणजेच प्रेक्षकांविना एकदिवसीय सामने खेळणार आहे.

त्यानंतर इंग्लंड पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे आयर्लंडविरुद्धची मालिका इंग्लंडसाठी महत्त्वाची असणार आहे. त्याचबरोबर इंग्लंड आयर्लंडविरुद्ध येत्या गुरुवारी आणि रविवारी सराव सामना खेळणार असल्याचे इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे. मागील आठवड्यात बेयरस्टो आणि अलीला इंग्लंडच्या 13 सदस्य असलेल्या संघात स्थान देण्यात आले नव्हते. जे वेस्ट इंडिजविरुद्ध जैविकदृष्ट्या सुरक्षित वातावरणात पहिला कसोटी सामना खेळत आहेत. वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन दुखापतग्रस्त झाल्यामुळे या मालिकेत सहभागी होणार नाही. नुकतीच त्याच्या हाताची शस्त्रक्रिया झाली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News