औषधांचा अतिरेक वृद्धांसाठी ठरू शकतो घातक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 19 March 2019

सकाळ वृत्तसेवा

खामगाव: म्हातारवयात विविध आजार जडत असतात. त्यावर उपचार म्हणून वेगवेगळ्या डॉक्टर कडून विविध प्रकारची औषधे दिल्या जातात. औषधे घेण्याचे प्रमाण वाढते. औषधांचा अतिरेक  वृद्ध रुग्णासाठी घातक ठरू शकतो, त्यामुळे डॉक्टरांनी 'डी प्रिस्कीपशन' म्हणजेच कमी औषधे देण्याची पद्धत उपयोगात आणावी, असे मार्गदर्शन नागपूर येथील प्रसिद्ध डॉ संजय बजाज यांनी केले. खामगाव येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. वाडी येथील आयएमए हॉलमध्ये रविवारी हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयएमए अध्यक्ष डॉ निलेश टापरे होते. मंचावर डॉ. संजय बजाज, डॉ सुश्रुत राजन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. संजय संजय बजाज यांनी म्हातारपणातील उपचार पद्धती बाबत विस्तृत मार्गदर्शन केले. डी प्रिस्कीपशन या विषयावर ग्लोबल स्तरावर अभ्यास आणि निरीक्षण सुरू आहेत. ही पद्धती आजच्या काळात गरजेची असल्याचे मत त्यांनी मांडले. डॉ. सुश्रुत राजन यांनी जॉइंट रिप्लेसमेंट विषयावर मार्गदर्शन केले. सुरवातीला मान्यवरांचा परीचय आयएमए सचिव डॉ. गुरुप्रसाद थेटे यांनी करून दिला. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्तविक डॉ निलेश टापरे यांनी केले. संचलन व  आभार डॉ. आर. के जाधव यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. आर. एम जैन, डॉ. विनोद राजनकर, डॉ. निलेश जाधव, डॉ. गणेश महाले,  डॉ.टीबडेवाल, डॉ. गोपाल सोनी, डॉ. प्रकाश मालु, डॉ. गौरव लढ्ढा,  डॉ श्रुती लढ्ढा यांच्यासह शहरातील डॉक्टर उपस्थित होते.

डॉ बजाज यांचे मोलाचे मार्गदर्शन

नागपूर येथील एम डी. मेडिसीन डॉ. संजय बजाज हे ग्लोबल स्तरावर राबविण्यात येत असलेल्या 'डी प्रिस्कीपशन' या उपचार पध्दतीबाबत मार्गदर्शन व जाणीव जागृतीचे काम करत आहेत. म्हातारपणी आरोग्याची काळजी व औषधोपचार याबात त्यांचा चांगला अभ्यास आहे. निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यशाळेत त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News