परदेशातील औद्योगिक प्रशिक्षण सीए साठी वैध?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 25 September 2020
  • सीए ची तयारी करणाऱ्या विद्यार्थासाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे सनदी लेखापाल (सीए) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता परदेशातही औद्योगिक प्रशिक्षण घेता येणार असून प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून आता दीड वर्ष करण्यात आला आहे.

मुंबई :- सीए ची तयारी करणाऱ्या विद्यार्थासाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे सनदी लेखापाल (सीए) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता परदेशातही औद्योगिक प्रशिक्षण घेता येणार असून प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून आता दीड वर्ष करण्यात आला आहे.

सनदी लेखापाल (सीए) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन वर्षे प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणे बंधनकारक असते. आतापर्यंत दोन वर्षे नोंदणीकृत सीएबरोबर काम केल्यानंतर इच्छा असल्यास एक वर्ष कोणत्याही कंपनीत, शासकीय संस्थेतील कामाचा अनुभव औद्योगिक प्रशिक्षण म्हणून ग्राह्य धरण्यात येत होता.

आता या ऐच्छिक औद्योगिक प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून दीड वर्ष करण्यात आला आहे. त्यानुसार किमान ९ महिने ते दीड वर्ष विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षण घेऊ शकतील. त्याचबरोबर परदेशातील कंपनीत काम करण्याची मुभाही देण्यात आली आहे. परंतु, ही कंपनी संस्थेने दिलेल्या निकषांमध्ये बसणारी आणि आंतरराष्ट्रीय मानके पूर्ण करणारी असणे आवश्यक आहे. इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटस ऑफ इंडियाने नवे नियम प्रकाशित केले आहेत.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News