अंधत्वावर मात करत पुण्याचा जयंत मंकले UPSE मध्ये देशात १४३ वा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 August 2020
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला.
  • यूपीएससी सिव्हिल सर्व्हिससाठी झालेल्या या परीक्षेत देशभरातून ८२९ महत्त्वाकांक्षी तरूण-तरूणी निवडले गेले आहेत.
  • या परीक्षेत प्रदीप सिंह यांचा देशात पहिला क्रमांकार आहे.
  • तर, जतीन किशोर आण प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
  • महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधराव्या रँकवर आहे. मात्र यात सगळ्यांचे लक्ष वेधले ते पुण्याच्या जयंत मंकलेने.

नवी दिल्ली :- केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिससाठी झालेल्या या परीक्षेत देशभरातून ८२९ महत्त्वाकांक्षी तरूण-तरूणी निवडले गेले आहेत. या परीक्षेत प्रदीप सिंह यांचा देशात पहिला क्रमांकार आहे. तर, जतीन किशोर आण प्रतिभा वर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राची नेहा भोसले देशात पंधराव्या रँकवर आहे. मात्र यात सगळ्यांचे लक्ष वेधले ते पुण्याच्या जयंत मंकलेने.

महाराष्ट्रातील जयंत मंकले या अंध विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत १४३ वा क्रमांक पटकावला आहे. याआधी जयंतने २०१७ मध्येही लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. मात्र त्यावेळी त्याचा ९३७ वा क्रमांक होता. त्यामुळे त्यांनी दोन वर्ष अथक परीश्रम करून पुन्हा परीक्षा दिली, आणि यावेळी त्यांना यश आले. २०१७ मध्ये यश न मिळाल्यामुळे एक वर्ष जयंत नैराश्यातही होता. मात्र अभ्यास करून जिद्दीने यंदा जयंतने १४३ वा क्रमांक मिळवला.

जयंतने संगमनेर येथील अमृतवाहिनी महाविद्यालयातून २०१३ मध्ये प्रथम श्रेणीत मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर तळेगाव दाभाडे आणि भोसरी येथे दोन वर्षे मेंटेनन्स इंजिनिअर म्हणून नोकरी केली. या कालावधीत जयंतला 'रेटिना पिग्मेन्टोसा' हा असाध्य आजार जडला. त्यामुळे जयंतची दृष्टी कमी कमी होत गेली. जयंतला सुरुवातीपासूनच लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची होती. मात्र आयईएस मध्ये दिव्यांगांना प्रवेश नसतो. त्यामुळे जयंतने शिक्षणाचा उपयोग व्हावा, यासाठी युपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

२०१५ पासून जयंतने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. २०१७ मध्ये मुलाखतीपर्यंत जयंत पोहचला होता, मात्र त्याची निवड झाली नाही. अखेर यंदा जयंत 143 वा रॅंक मिळवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News