मुंबई :- अलिकडे सर्वच जण लगेच डिप्रेशनमध्ये जाताना पाहतो. कोणत्याही कारणामुळे लोक डिप्रेशनमध्ये जातात. मग त्यात काही वेगवेगळे पर्याय निवडत असतात. तर काही स्वत:चे आयुष्य संपवतात. डिप्रेशनमधून बाहेर पडणे म्हणजे कठीणच असते परंतु कुणाचा आधार असेल तर ते शक्य होते आणि अशाच आधारामुळे एक तरूण डिप्रेशनच्या विळख्यातून बाहेर पडला आहे. इतकेच नाही तर तो आता जे लोक डिप्रेशनमध्ये आहेत, त्यांना तो आधार देतो आणि त्यांना डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी पूर्णपणे मदत करत आहे.
“ह्युमन्स ऑफ बॉम्बे” या फेसबुक पेजवर या तरुणाने डिप्रेशनबाबतचा आपला अनुभव शेअर केला आहे. या तरुणाची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. प्रेमात फसवणूक झाल्याने हा तरुण डिप्रेशनमध्ये गेला होता. तरूणाने त्यांच्या डिप्रेशनचे कारण सांगितले, “दोन वर्षांपूर्वी मी खूप आनंदी होतो, प्रेमात होता आणि माझे आयुष्य एकदम सुरळीत सुरू होते. एक दिवशी अचानक माझ्या गर्लफ्रेंडने माझ्यासोबत ब्रेकअप केला. तिने सांगितले आपल्या दोघांमध्ये खूप फरक आहे. ब्रेकअप झाला त्या रात्री मी खूप अस्वस्थ झालो. मला एन्झायटीचा अटॅक आला आणि मी डिप्रेशनमध्ये गेलो. एन्झायटीच माझी सोबती झाली होती. मला रात्री झोप लागायची नाही. मला सर्वकाही आठवून खूप रडायला यायचे, एकदा असेच रडता रडता मी जमिनीवर कोसळलो. मला श्वास घ्यायला त्रास होत होता. माझी अवस्था पाहून माझ्या रूममेटने मला रुग्णालयात पोहोचवले."
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1469521556590150&id=18805606...
तरुण म्हणाला, "मला खूप त्रास होत होता. तीन महिने मी कामही केलं नाही. या सर्वातून बाहेर पडण्यासाठी ब्रेक गरजेचा होता असे मला वाटले. मी माझ्या घरी माझ्या आईवडिलांजवळ गेलो. माझ्या वडिलांना माझ्यावर अँटिडिप्रेशनची औषधे मिळाली आणि त्यांना माझी चिंता वाटू लागली. माझ्या आईने मला खूप समजावले, तुझ्यावर खरे प्रेम करणाऱ्यांना त्रास होईल असे तू काही करू नको असे आईने सांगितले. पालकांचे म्हणणे, ही बरोबर होते पण मी फक्त माझ्या गर्लफ्रेंडचाच विचार करत होतो. "माझ्या मित्राने माझी खूप मदत केली. तासातासाला तो माझ्या तब्येतीची चौकशी करायचा, माझ्यासाठी चहा बनवायचा, आम्ही दोघे चित्रपट पाहायला देखील जायचो. मी त्याच्यासाठी खूप काही आहे, असे तो मला म्हणाला आणि मला ते ऐकून खूप बरे वाटले. हळूहळू सर्वकाही ठिक होऊ लागले. मी पुन्हा कामावर जाऊ लागलो आणि स्वत:ला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करू लागलो", असे तरुणाने सांगितले.
तरुण म्हणाला, "मी मानसिक आरोग्याबाबत वाचन करायला सुरू केले आणि मग मला समजले या परिस्थितीतून जाणारा मी एकटा नाही. नुकतेच मी एका तरुणाने आत्महत्या केल्याची पोस्ट इन्स्टाग्रामवर वाचली आणि ती पोस्ट माझे मित्र आणि सुसाइड प्रिव्हेन्शन अॅक्टिव्हिस्टसह शेअर केली. त्यांनी त्या तरुणीला वाचवले. यानंतर दोन-तीन दिवस मी खूप विचार केला. असे कित्येक लोक आहेत जे या परिस्थितीतून जात आहेत, लोकांना काय काय सहन करावे लागत आहे. मला वाटले मानसिक आरोग्याबाबत मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे."
"गेल्या दोन वर्षांत मी आयुष्याकडून खूप काही शिकलो. तुम्ही अशा व्यक्तीवर प्रेम करू शकत नाही, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत नाही. मला माझे प्रेम पुन्हा मिळाले नाही, मात्र माझ्या मनावरील घाव हळूहळू भरू लागले. मला माझ्या रूममेटने खूप काही शिकवले. माझी आई आजही मला थेरेपी घेण्याची आठवण करून देते. सर्वजण माझी खूप काळजी घेतात हे मला माहिती आहे. आता मला आयुष्यात खूप पुढे जायचं आहे आणि माझं स्वप्नं पूर्ण करायचं आहे", अशी जिद्द आता या तरुणाने बाळगली आहे.